जबलपूर (मध्य प्रदेश) MP Vidhan Sabha Voting : मध्य प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जबलपूरमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलाय. जबलपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये एक दिव्यांग व्यक्ती तीनचाकीवर पोहोचली आणि त्याच तीनचाकीवर बसून मतदानही केलं. त्याचवेळी उत्तर मध्य विधानसभेच्या नेपियर टाऊनमध्ये 80 वर्षीय महिला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचली. या महिलेनं रांगेत उभं राहून मतदान केलं आणि लोकांनाही थोडा वेळ काढून मतदान करण्याचं आवाहन केलं.
ट्रायसायकलवर बसून मतदान : दिव्यांगांना आपल्या घरातच मतदानाची सुविधा दिली जाईल, असा दावा प्रशासनानं केला होता. मात्र जबलपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये 70 वर्षांचे इंद्रभान पटेल मतदान करण्यासाठी आले. पटेल यांचे दोन्ही पाय निकामी असल्यानं ते ट्रायसायकलवर मतदान केंद्रावर आले. चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या ट्रायसायकलसाठी सायन्स कॉलेजमध्ये रॅम्प बांधण्यात आला होता. या रॅम्पद्वारे ते त्यांच्या ट्रायसायकलसह पूलिंग बूथवर पोहोचलं आणि त्यांनी ट्रायसायकलवर बसूनच मतदान केलं. इंद्रभान पटेल यांचं म्हणणं आहे की, गेल्या 25 वर्षांपासून ते याच पद्धतीनं मतदान करत आहेत. मात्र प्रशासनानं त्यांना घरी बसून मतदान करता येईल अशी कोणतीही पूर्व माहिती दिली नव्हती. त्यामुळं ते मतदान केंद्रावर पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत लोक मतदान करु शकतात. मतदानासाठी जावं, कारण लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याचं इंद्रभान पटेल म्हणाले.