बुरहानपूर (मध्यप्रदेश):नेपानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. ज्याने दिल्लीच्या बुराडी प्रकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. दावलीखुर्द गावात रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रहिवाशांनी नेपानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व बाबींची कसून चौकशी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
कुटुंबप्रमुखाने हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय: बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर भागातील डावलीखुर्द गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली. मृतांमध्ये तीन मुले आणि पती-पत्नीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मनोज हा अनेक दिवसांपासून आपल्या आजारपणामुळे चिंतेत होता. उपचार करून दोन दिवसांपूर्वी तो आला होता. मृत मनोजने आधी पत्नी आणि नंतर तीन लहान मुलांचा गळा आवळून खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर अखेर त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृताने एवढं मोठं पाऊल कोणत्या कारणामुळे उचललं आहे, हे स्पष्ट झालेले नाही.