महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मोदींना सांगणार, लोक तुम्हाला शिव्या देतात' - खासदार संजय राऊत - Mohan Delkar commits suicide

शिवसेना नेते खासदार संजय राऊत दादरा-नगर हवेली येथे प्रचारानिमित्त गेले आहेत. दादरा-नगर हवेली येथील राज्यसभा खासदार मोहन डेलकर यांचं निधन झाल्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानिमित्त्त संजय राऊत दादरा-नगर हवेलीत दाखल झाले आहे.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

By

Published : Oct 16, 2021, 1:16 PM IST

Updated : Oct 16, 2021, 2:12 PM IST

दादरा-नगर हवेली - राज्यातील प्रशासन अमानुष आहे. रावणापेक्षाही भयंकर वृत्ती त्यांची आहे. त्यामुळे येथील जनता नरेंद्र मोदींना शिव्या देतात. ही परिस्थिती मी स्वत: प्रत्यक्ष भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते दादरा-नगर हवेली येथे राज्यसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारार्थ आले. त्यावेळी ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी एप्रिल महिन्यात मुंबई येथे आत्महत्या केली. प्रशासनाकडून मिळत असलेल्या अमानुष वागणुकीमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे दादरा-नगर हवेली राज्यसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. मोहन डेलकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शिवसेना खासदार संजय राऊत सध्या दादरा-नगर हवेलीत दाखल झाले आहेत.

डेलकरांच्या आत्महत्येचा बदला घेणार -

संजय राऊत म्हणाले, मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा निवडणुकीच्या माध्यमातून बदल घेणार असून कलाबेन डेलकर यांचा इतिहासातील सर्वांत मोठा विजय होईल. तसेच त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याने त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र असून दिल्लीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणार. आणि येथील प्रशासनाची दहशत आम्ही संपवणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत केले.

Last Updated : Oct 16, 2021, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details