नवी दिल्ली- पीक विमा योजनेसाठी ( PM crop insurance scheme ) शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतात. मात्र, पीकविमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना तक्रार करण्याची सुविधा ( complaints against crop loan ) नाही. तक्रारीसाठी केवळ 72 तासांची मुदत दिली जाते. याबाबतचा प्रश्न खासदार संजय जाधव ( MP Sanjay Jadhav in Loksabha ) यांनी लोकसभेत उपस्थित केला.
खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. राज्यस्तरावरील सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे अनेकांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामधील त्रुटी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार श्रंगारे यांनी केली.