महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mahua Moitra: खरे 'पप्पू' तर मोदी सरकार! अर्थव्यवस्थेवर बोलताना तृणमूल खासदारांचा टोला - महुआ मोईत्रा काय म्हणाल्या

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये लोकांना आश्वासन दिले होते की सरकार चांगले काम करत आहे. परंतु, अर्थव्यवस्थेविषयीची काही आकडेवारी अशी आहे की जीथे शुन्य काम आहे. त्यामुळे सरकार लोकांशी खोटे बोलले आहे. तसेच, यावरून स्पष्ट होते की खरा 'पप्पू' कोण आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. त्या लोकसभेत बोलत होत्या.

MP Mahua Moitra
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

By

Published : Dec 13, 2022, 9:17 PM IST

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मंगळवारी आर्थिक निर्देशकांवर आणि सरकार ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था हाताळत आहे त्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आर्थिक निर्देशांकातील आकडेवारी पाहिली तर 'खरा पप्पू' कोण असा प्रश्न उपस्थित होते असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर चांगलाचा हल्ला चढवला आहे. लोकसभेत (2022-23)च्या अनुदानाच्या पुरवणी मागण्या आणि (2019-20)च्या अनुदानाच्या अतिरिक्त मागण्यांच्या पहिल्या सत्रात महुआ मोईत्रा बोलत होत्या. कोणाला तरी निराश करण्यासाठी 'पप्पू'" शब्दसंग्रह वापरले. . आकडेवारीवरून कळते 'खरा पप्पू' कोण?

लोकसभेत बोलताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

डिसेंबरमध्ये सत्य समोर येईल - तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांनी औद्योगिक उत्पादनावरील आकडेवारीचा हवाला देत आर्थिक प्रगतीच्या सरकारच्या दाव्यांवर लोकसभेत बोलताना चांगलाच हल्ला चढवला. सरकारवर निशाणा साधत महुआ मोइत्रा यांनी आज मंगळवार (दि. 13 डिसेंबर)रोजी फेब्रुवारीमध्ये सरकारने लोकांना आश्वासन दिले होते की अर्थव्यवस्था चांगली चालली आहे. प्रत्येकाला गॅस सिलिंडर, घर आणि वीज यासारख्या सर्व मूलभूत सुविधा मिळत आहेत. परंतु, सरकारचे हे दावे खोटे आहेत असे म्हणत आता आठ महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये सत्य समोर येईल असही त्या म्हणाल्या आहेत.

मोदी सरकारवर सडकून टीका केली -महुआ मोईत्रा यांनी (2022-23)साठी अतिरिक्त अनुदानाच्या मागणीवरील लोकसभेतील चर्चेत मोदी सरकारवर भारताच्या विकासाबद्दल खोटेपणा पसरवल्याचा आरोप केला. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, महुआ मोईत्रा म्हणाल्या की, भाजप सरकार काही लोकांना अकार्यक्षम दाखवण्यासाठी 'पप्पू' हा शब्द वापरते. परंतु, सरकारचे आर्थिक आकडे दाखवतात की खरे पप्पू कोण आहे? असे म्हणत मोईत्रा यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. दरम्यान, त्यांनी भाजपच्या हिमाचल प्रदेशातील पराभवावरही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, भाजप अध्यक्ष निवडणुकीत आपले गृहराज्यही वाचवू शकले नाहीत, मग सांगा खरे पप्पू कोण आहे?

भारताचे नागरिकत्व सोडण्यावरी भाष्य - टीएमसी खासदाराने आपल्या भाषणात भारताचे नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की (2014 ते 2022)दरम्यान भारताचे नागरिकत्व सोडणाऱ्या एकूण भारतीयांची संख्या 12.5 लाखांहून अधिक झाली आहे. ही बाब गंभीर असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details