कटनी :मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात सरपंचाच्या विजयानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात ( Slogans of Pakistan Zindabad in Katni ) आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ (Pro Pakistan Slogans in Katni) उडाली. मोठ्या संख्येने लोकांनी कुथला पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे तक्रार केली. सीएसपी विजय प्रताप सिंह म्हणाले की - "लोकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या व्हिडिओच्या सत्यतेचा तपास करत आहेत आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे". ईटीव्ही भारत या व्हिडिओची सत्यता पडताळणी करत नाही.
समर्थकांनी पाकिस्तानच्या घोषणा दिल्या: प्रकरण कुथला पोलीस स्टेशन परिसरातील चका ग्रामपंचायतीचे आहे. जेथे मतमोजणीनंतर मुस्लिम सरपंच उमेदवार रहिसा बेगम विजयी झाल्या आहेत. यानंतर त्यांच्या समर्थकांनी रहिसा बेगम जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'हिंदुस्थान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. हाच दावा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.