महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2021, 9:09 AM IST

ETV Bharat / bharat

VIDEO: बचाव करण्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वतः पुरात अडकले, हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू

मध्य प्रदेश राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा पूरात अडकलेल्याच्या मदतीसाठी गेले होते.मात्र, ते स्वतः पुरात अडकले. हेलिकॉप्टरने त्यांना रेस्क्यू करण्यात आले.

MP Home Minister
गृह मंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाळ - राज्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा पूरात अडकल्याने एकच गोंधळ उडाला होता. एनडीआरएफच्या जवानांनी एयरलिफ्ट करून त्यांना वाचवलं. मध्य प्रदेशमध्ये पावसाने कहर घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. पाण्याच्या पातळीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मध्य प्रदेश राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा पूरात अडकले. हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू.

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा पूरग्रस्त दतिया जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, त्यांना कोत्रा ​​गावातील एका घराच्या छतावर काही लोकांना अडकलेले पाहिले. छप्पर वगळता घर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. तेव्हा ते स्वतः घराच्या छतावर उतरले. तत्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना लोकांना वाचवण्यास सांगितले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली. मात्र, बोटीवर एक झाड पडले. त्यानंतर मोटार सुरू करणे शक्य झाले नाही आणि बोट अडकली. यावेळी पुरग्रस्तांसोबत मिश्रासुद्धा पुरात अडकले.

गृह मंत्री नरोत्तम मिश्रा

यावेळी मिश्रा यांनी सरकारी अधिकाऱ्यांना एक संदेश पाठवला. त्यांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. यावेळी मिश्रा यांनी घाबरून न जाता प्रथम तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यानंतर जवानांनी गृहमंत्र्यांना एअरलिफ्ट केले. यापूर्वीही नरोत्तम मिश्रा यांनी जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे. ते स्वत: देखील मदत आणि बचाव पथकासह घटनास्थळी अनेक लोकांना वाचवण्यासाठी गेले आहेत.

मुसळधार पावसामुळे 1,200 गावे प्रभावित -

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पूर परिस्थतीची पाहणी करत आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील सुमारे 1,200 गावे प्रभावित झाली आहेत. आतापर्यंत 5,950 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. लष्कर, एनडीआरएफ, बीएसएफ आणि राज्यातील इतर एजन्सी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. पूरग्रस्त भागात अजूनही सुमारे 2 हजार लोक अडकले आहेत आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवपुरी, शेओपूर, दातिया, ग्वाल्हेर, गुना, भिंड आणि मोरेना हे जिल्हे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा -Video : मध्य प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररूप; सिंध नदीच्या प्रवाहात संकुआनवरील पूल गेला वाहून

ABOUT THE AUTHOR

...view details