ग्वालियर (म.प्र) -अवाजवी वीजबिल मिळाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, मात्र ग्वालियरमध्ये आश्चर्य व्यक्त करणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका वीजबिल ग्राहकाला तब्बल 34 अब्ज रुपयांचे बिल आले आहे. ते पाहून ग्राहकाचा बीपीच वाढला आणि त्यास रुग्णालयात भरती करावे लागले. दरम्यान, विद्युत विभागने ही मानवीय चूक असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई केल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांचे गृहनगर ग्वाल्हेरमध्ये प्रकार घडला.
हेही वाचा -Earthquake in Philippines - उत्तर फिलीपिन्समध्ये 7.0 रिश्टर स्केलचा भूकंप, इमारतींना नुकसान
काय आहे प्रकरण? - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये वीज विभागाच्या चुकीने एका कुटुंबावर संकटच कोसळले. शहराच्या मध्यभागी असलेल्या मेट्रो टॉवरच्या मागे, शहरातील पॉश भागात, शिव बिहार कॉलनीत प्रियंका गुप्ता यांचे घर आहे, प्रियांका गृहिणी आहे आणि त्यांचे पती संजीव कनकने हे वकील आहे. यावेळी आपल्याला 3 हजार 419 कोटींपेक्षा अधिकचे वीजबिल आल्याचे संजीव यांनी सांगितले. हे बिल पाहून माझी पत्नी प्रियांका हिचा ब्लड प्रेशर वाढला. माझे वडील राजेंद्र प्रसाद गुप्ता यांना तर ब्लड प्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती संजीव यांनी सांगितले.