इंदूर (मध्य प्रदेश): 2011 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलक कार्यकर्त्यांशी झालेल्या संघर्ष (case of clash with BJYM workers) प्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील न्यायालयाने शनिवारी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress leader Digvijay Singh) यांच्यासह सहा जणांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा (Digvijaya Singh awarded one-year jail) सुनावली. नंतर न्यायालयाने सर्व दोषींना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश मुकेश नाथ यांनी सिंह आणि उज्जैनचे माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांना भारतीय दंड संहिता कलम ३२५ (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि १०९ (हल्ला करण्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवले. अनंत नारायण, जयसिंग दरबार, अस्लम लाला आणि दिलीप चौधरी यांना आयपीसी कलम ३२५ अन्वये दोषी ठरवण्यात आले.
Conflict with Activists : दिग्विजय सिंह यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह
2011 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा च्या आंदोलक कार्यकर्त्यांशी झालेल्या संघर्षाच्या (case of clash with BJYM workers) प्रकरणात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress leader Digvijay Singh) यांच्यासह किमान सहा जणांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा (Digvijaya Singh awarded one-year jail) सुनावण्यात आली आहे.न्यायालयाने सर्व दोषींना जामीन मंजूर केला आहे.
तराना येथील काँग्रेस आमदार महेश परमार, मुकेश भाटी आणि हेमंत चौहान यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दोषींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जामीन मिळाल्यानंतर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आपण या शिक्षेविरुद्ध अपील करणार आहोत. "मूळ एफआयआरमध्ये माझ्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेखही करण्यात आलेला नाही. पोलिसांनी नंतर राजकीय दबावाखाली आरोपींच्या यादीत माझे नाव समाविष्ट केले,".
सिंह आणि गुड्डू यांचे वकील राहुल शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्यावर युवामोर्चा कार्यकर्ता रितेश खाबियाला मारहाण करण्यासाठी इतरांना प्रवृत्त केल्याचा आरोप आहे." तक्रारदाराच्या तक्रारीनुसार खाबियाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्याच्या डाव्या हाताचे हाड तुटले होते," पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी 17 जुलै 2011 रोजी सिंह यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता, जेव्हा त्यांचा ताफा उज्जैनच्या जिवाजीगंज भागातून जात होता, ज्यामुळे हाणामारी झाली.