भोपाळ -देशातील वेगवेगळ्या राज्यात महिला आणि मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर अल्पवयीनमुलांसमोर बलात्कार करून तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भाजपा अध्यक्ष बी.डी. शर्मा यांच्या मतदारसंघापासून आणि जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहोपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंदगगढ गावातील एका दलित कुटुंबावर आत्याचार झाला आहे.
मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलांसमोर गर्भवती महिलेवर बलात्कार पीडित महिलेचा पती बैजनाथ अहिरवारने गावातील गुंड पटेल नामक व्यक्तीच्या शेतात आजारी असल्याच्या कारणाने काम करण्यास नकार दिला. तेव्हा बैजनाथ अहिरवार आणि त्याचा भाऊ लखन अहिरवारला आरोपींनी मारहाण केली. तेथून जीव वाचवून ते दोघेही गावातून पळून गेले. मात्र, त्यांचे कुटुंब गावातच होते. आरोपी हे बैजनाथ अहिरवारच्या घरात घुसले आणि त्यांनी बैजनाथची पत्नींवर बलात्कार तसेच मारहाण केला. यावेळी पीडितेच्या सासूने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी 70 वर्षीय सासूलाही मारहाण केली.
आरोपींना अटक न केल्यास काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा -
पीडितेने याची वाच्यता कुठेही करू नये म्हणून तीला तीच्याच घरात बंधक बनवून ठेवले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पीडिता घरातच बंद आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष लोकेंद्र वर्मा यांनी आरोपींना येत्या 24 तासांच्या आत अटक करावे नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मध्य प्रदेश सरकारला दिला आहे.
बंगळुरूतील बांगलादेशी युवतीचे लैंगिक -
काही दिवसापूर्वीच बंगळुरूत एका बांगलादेशी युवतीचे लैंगिक शोषण करुन, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणींसह सहा जणांना अटक केली आहे. त्यानंतर या घटनेचा दुसरा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण-तरुणी पीडितेला अमानुष मारहाण करताना दिसून येत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रिदाई बाबू, रकीबुल इस्लाम सागर, मुहम्मद बाबू शेख, अखिल, काजल, नजरथ या सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांनी पीडितेवर बलात्कार केल्याचेही सांगितले जात आहे. तसेच, पीडिताही पोलिसांना केरळमध्ये मिळाली असून, तिला बंगळुरूला आणले जात आहे.