भोपाळ : भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हेही दाखल करण्यात आले. या दरम्यान भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र कैसरगंज येथील रविवारच्या सभेत ब्रिजभूषण सिंह यांनी खास शायराना अंदाजात आपल्यावरील आरोपाचे खंडन केले. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी मोठे शक्तीप्रदर्शनही केले. ब्रिजभूषण सिंह यांनी कभी अश्क . . .कभी गम . . . और कभी जहर पिया जाता है, अशी शायरी सादर करत आपल्यावर लावलेल्या आरोपाचे खंडन केले.
खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केले शक्तीप्रदर्शन :कैसरगंज येथे रविवारी भाजप सरकारच्या 9 वर्षांच्या अतुलनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती नागरिकांना देण्यात आली. बालपूर बाजारजवळील एका खासगी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते होते. सरकारच्या कामगिरीची माहिती देण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषण सिंह यांनीही शक्तिप्रदर्शन केले. रोड शो करत खासदार ब्रिजभूषण सिंह हे घटनास्थळी पोहोचले.
'कभी अश्क-कभी गम और कभी जहर पिया जाता है, तब यह मिला मुझको मोहब्बत का सिला, बेवफा कहके मेरा नाम लिया जाता है, इसको रुसवाई कहें या शोहरत, अपने दबे होठों से मेरा नाम लिया जाता है, कभी-कभी अपने आप से सवाल करने लगते हैं, जब-जब सरसरी नजर से सवाल करते हैं, तो गंभीर चीजों को नकार देते हैं' - ब्रिजभूषण सिंह यांनी सादर केलेली शायरी