मुंबई - राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची ( Raj Thackeray Ayodhya Visit ) माफी मागावी, अन्यथा त्यांना मी अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी ( MP Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray ) दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांनी राज ठाकरे यांना भेटू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
काय म्हणाले ब्रीजभूषण शरण सिंह -आम्ही 2008 पासून बघतो आहे. त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय लोकांवर टीका केली आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी. तसेच त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. तसेच तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांना भेटू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
कसा असेल दौरा? -मनसेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आपले कुटुंबीय व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह जूनच्या चार तारखेला उत्तर प्रदेशला रवाना होतील. यावेळी त्यांचे पुत्र मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व पत्नी शर्मिला ठाकरे या देखील सोबत असतील. राज ठाकरे मुंबईहून लखनऊला जातील. व तिथून ते आयोध्या राम जन्मभूमी येथे दर्शन घेतील. तसेच तेथील काही आखाड्यांना देखील भेट देतील. त्यानंतर या सर्व भेटी झाल्यावर ते पुन्हा आयोध्या ते लखनऊ आणि लखनऊ मधून पुन्हा मुंबई असा प्रवास करतील. असा त्यांचा आयोध्या दौरा असेल.