महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2023, 1:42 PM IST

ETV Bharat / bharat

Ram Katha for Muslim: मुस्लिम समाजासाठी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री करणार रामकथा, 'या' ठिकाणी होणार आयोजन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आवाहनानंतर आणि चमत्कारांच्या दाव्यांनी चर्चेत आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी मोठी घोषणा केली आहे. जबलपूर येथील पनागर येथे मुस्लिम समाजासाठी रामकथेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

MP: Bageshwar Dham Pandit Dhirendra Shastri announces soon do katha among muslim community in katni
मुस्लिम समाजासाठी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री करणार रामकथा, 'या' ठिकाणी होणार आयोजन

जबलपूर (मध्यप्रदेश): पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी बागेश्वर जबलपूर येथील त्यांचे मुस्लिम भक्त तनवीर खान यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. तन्वीर खान यांनी कटनी येथे रामकथेचे आयोजन करण्यासाठी पंडित धीरेंद्र शास्त्री यांना आमंत्रित केले होते. त्यामुळे आता धीरेंद्र शास्त्री हे मुस्लिम समाजासाठी रामकथेचे आयोजन करण्यात येणार आहे.

रामकथेचे निमंत्रण स्वीकारले:पंडित धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम त्यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत ते अनेकदा व्यासपीठावरून बोलताना दिसले असून, हिरव्या झेंड्याला विरोध केल्यामुळे त्यांच्यावर राजस्थानमध्ये त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यातही धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यावेळी आपली प्रतिमा बदलत त्यांनी एका मुस्लिम भक्ताचे रामकथेचे निमंत्रण स्वीकारले आहे.

टोप्या घालून येतील रामकथेला:जबलपूर येथील पानगर येथे भागवत कथेच्या वेळी त्यांनी मंचावरून ही घोषणा केली आणि सांगितले की, आतापर्यंत तुम्ही हिंदू कुटुंबांमध्ये हिंदू धार्मिक कार्यक्रम होत असल्याचे पाहिले असेल. परंतु भारतात प्रथमच एक मुस्लिम कुटुंब रामकथा आयोजित करणार आहे आणि येथे सर्वजण टोप्या घालून येतील आणि राम कथेच्या माध्यमातून एकत्र येतील. तन्वीर खान कटनीच्या पीर बाबा ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि पीर बाबा ट्रस्टला कटनीमध्ये खूप प्रसिद्धी आहे. त्यामुळे पीर बाबा ट्रस्टच्या माध्यमातून रामकथेचे आयोजन केले तर ते यशस्वी होईल. हा कार्यक्रम म्हणजे नवीन प्रकारची धार्मिक युती असेल. या कार्यक्रमाची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी सध्या पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नव्या वादाला दिला जन्म:कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून धार्मिक कार्यक्रम हे संवेदनशील मानले जातात. भारतात लोकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे, त्यामुळे सरकारला लोकांच्या या अधिकाराचे रक्षण करावे लागते. आजकाल ज्या पद्धतीने राजकीय वक्तव्ये केली जातात. धार्मिक कार्यक्रमांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, असे वातावरण निर्माण होऊ शकते. आता बाबा बागेश्वर यांच्या रामकथेच्या संस्थेने मुस्लिम समाजात एका नव्या वादाला जन्म दिला आहे.

हेही वाचा: नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच, जवानांवर केला आयईडीने हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details