भिंड MP Assembly Election 2023 : असं म्हणतात की माणूस कितीही मोठा असेल तरी तो देवाला घाबरतो. परीक्षेपूर्वी परीक्षार्थी चांगल्या निकालाच्या आशेनं देवाचा आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळात राजकारणीही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात. महाकाल दरबारापासून पितांबरा माई पीठापर्यंत मध्य प्रदेशातील अशी काही मंदिरे आहेत. जिथे केवळ स्थानिक नेतेच नाही तर सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वजण दर्शन घ्यायला येतात. विशेषत: निवडणुकीच्या वेळी तर विशेष पूजाविधीसाठी बुकिंगही केली जाते.
माता बगुलामुखी मंदिर : मध्य प्रदेशातील पितांबरा माई पीठ हे राजकारण्यांसाठी दैवी स्थान म्हणून शीर्षस्थानी येतं. राज्यातील दतिया जिल्ह्यात असलेलं पितांबरा मातेचं हे मंदिर देशातील बड्या राजकारण्यांसह अभिनेत्यांच्या पूजेचे केंद्र आहे. येथे विराजमान असलेली माता बगुलामुखी ही शक्तीची तसंच शत्रूचे दमन आणि वैभवाची देवी असल्याचं म्हटलं जातं. येथे येणाऱ्या भाविकांचा मोठा वर्ग राजकारणाशी संबंधित आहे.
'या' कारणास्तव देवीला राजेशाहीची देवी म्हंटल जातं :येथे दरबारात बगुलामुखी देवी सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे. येथील सुवर्ण सिंहासन हे राजेशाही सुखाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. अशा स्थितीत येथे मातृदेवतेचं दर्शन घेऊन पूजा करणाऱ्या नेत्याला राजेशाही आणि संपत्तीचे आशीर्वाद मिळतात. तसंच येथील मातेची मूर्ती चार हातांची आहे. त्याच्या एका हातात गदा, दुसऱ्या हातात फास, तिसऱ्या हातात वज्र आणि चौथ्या हातात राक्षसाची जीभ आहे. त्यामुळं असं मानलं जातं की येथे विधी करणार्यांचे विरोधक शांत होऊन जातात अन् विरोध करत नाहीत.
नेहरू-इंदिरा, अटलजींनीही लावली होती हजेरी : मध्य प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातूनही राजकीय नेतेमंडळी पितांबरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येतात. दतियाच्या जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही नेत्यावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तो पितांबरा देवीच्या दरबारात हजेरी लावतो. 1960 मध्ये चीननं भारतावर हल्ला केला. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी येथे देवीला साद घातली होती, असं सांगण्यात येतं.
महाकालेश्वर (उज्जैन) : अवंतिका नगरात वसलेला बाबा महाकालचा दरबार हे ते दिव्य स्थान आहे. राजकारणातील वरपासून खालपर्यंत जवळपास प्रत्येक नेता आणि मंत्री येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. केवळ मध्य प्रदेशातूनच नाही तर गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते दर्शनासाठी येतात. येथील बाबांच्या दरबारात पंतप्रधान मोदी स्वतः ध्यान करतात.
रावतपुरा धाम (लहार, जिल्हा-भिंड) :चंबळच्या भिंड जिल्ह्यात स्थित रावतपुरा धामचा देखील या मंदिरांमध्ये समावेश आहे. हे मंदिर लहर परिसरातील रावतपुरा गावात असून रावतपुरा धाम महंत रविकिशन महाराज यांच्या आश्रम ट्रस्टद्वारे त्याची देखभाल केली जाते. या मंदिराची कीर्ती देश-विदेशात पसरलेली आहे. अलीकडच्या काळात माजी मुख्यमंत्री उमा भारती ते विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह, मंत्री गोविंद सिंह राजपूत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हनुमानजींच्या दर्शनासाठी येथे आले आहेत. विशेषत: गुप्त विधीसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपल्या कुटुंबीयांसह तीन वेळा येथे आले आणि पूजा केली.
माँ बगुलमुखी मंदिर नालखेडा (जिल्हा-शाजापूर) :शाजापूर जिल्ह्यातील नालखेडा येथे असलेल्या माँ बगुलमुखी मंदिराचाही मध्य प्रदेशातील मंदिरांमध्ये समावेश आहे. जिथे राजकारणाशी संबंधित लोकांचा विश्वास असतो. असं मानलं जातं की, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कौरवांवर विजय मिळवण्यासाठी पांडवांनी येथे मंदिराची स्थापना केली. त्यामुळं सत्तेची लालसा नेहमीच राजकारण्यांना इथे ओढून घेते. हे मंदिर तंत्र साधना आणि विधींसाठीही ओळखलं जातं. भारतीय राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी माँ बगुलमुखीचे दर्शन घेऊन निवडणुकीत विजय मिळवलाय. यामुळंच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आल्या की अनेक राजकारणी विशेषत: विजयासाठी छुपे विधी करतात. याशिवाय राजकारणाशी निगडित अनेक व्यक्ती मातेच्या दर्शनासाठी आणि हवनविधीसाठी नियमितपणे येथे येत असतात.
हेही वाचा -
- Annakoot festival 2023 : 'या' मंदिरात भाविक टोळ्या करून लुटतात देवाचा प्रसाद, ३५० वर्षांपासून आहे परंपरा
- Annakut Celebration Bhavnagar: स्वामी नारायण मंदिरात श्रीकृष्णाला 1200 पदार्थांचे अन्नकूट अर्पण, पाहा व्हिडिओ
- Diwali 2023 : देशभरात दिवाळीची धूम, मंदिरांमध्ये उसळली भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ