महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी तोडफोड; 5 जण ताब्यात - हिंदू सेना तोडफोड

हल्लेखोरांनी खासदार ओवैसी यांच्या घरातील प्रवेशद्वार आणि खिडक्यांचे नुकसान केले आहे. यावेळी खासदार असुद्दीन बंगल्यामध्ये उपस्थित नव्हते. बंगल्यामधील नेमप्लेट, ट्यूबचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

असुद्दीन ओवैसी
असुद्दीन ओवैसी

By

Published : Sep 21, 2021, 9:21 PM IST

नवी दिल्ली - एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

हैदराबादचे लोकसभा खासदार असुद्दीन ओवैसी यांची सरकारी निवासस्थान हे नवी दिल्लीमधील अशोका रोडवर आहे. या निवास्थानी तोडफोड झाल्याची माहिती सरकारी बंगल्याचे केअरटेकर दीपा यांनी सांगितले. बंगल्यावर 7 ते 8 जणांनी हल्ला केल्याची त्यांनी माहिती दिली. या हल्लेखोरांनी घरामध्ये वीटा फेकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू सेनेच्या 5 सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी उत्तरपूर्व दिल्लीमधील मंडोली येथील रहिवाशी आहेत. या आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. या तोडफोडीत सहभागी असलेल्या इतर जणांनाही पोलीस शोधत आहेत.

हेही वाचा-कर्नाटक: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अपार्टमेंटमध्ये भीषण आग; दोघांचा मृत्यू

ओवैसी यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी तोडफोड

बंगल्यामधील नेमप्लेट, ट्यूबचे नुकसान

खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या बंगल्यावर हल्ल्याची माहिती पोलिसांना फोनवर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक असुद्दीन यांच्या निवासस्थानी पोहोचले. हल्लेखोरांनी खासदार ओवैसी यांच्या घरातील प्रवेशद्वार आणि खिडक्यांचे नुकसान केले आहे. यावेळी खासदार असुद्दीन बंगल्यामध्ये उपस्थित नव्हते. बंगल्यामधील नेमप्लेट, ट्यूबचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-पोलिसांचा लॉजवर छापा; रुमधील टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला, पाहा VIDEO

तालिबानच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला नुकतेच दिले होते आव्हान-

एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तालिबानच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला नुकतेच आव्हान दिले होते. या सरकारमध्ये दम असेल तर तालिबानला दहशतवादी घोषित करावे, असे ओवैसी यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी अब्बा जान म्हणत वादग्रस्त विधान केले होते. प्रतिमा मलीन होत असताना वाचविण्यासाठी योगी खोटे बोलत असल्याची ओवैसी यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details