कोईम्बतूर ( तामिळनाडू ) : उद्योगपती आनंद महिंद्रा ( Industrialist Anand Mahindra ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि ते दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना जागरूक ठेवतात. तसेच आनंद महिंद्रा किती उदार व्यक्ती आहे, हे त्यांच्या ट्विटर हँडलवर ( Anand Mahindra Twitter ) पाहून कळते. मदर्स डे निमित्त आनंद महिंद्रा यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहणाऱ्या इडली अम्मा यांना घर भेट ( Anand Mahindra Gifts House To Idly Amma ) दिले. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा आणि त्यांच्या नात्याची सुरुवातही एका ट्विटने झाली.
आनंद महिंद्रांनी केले ट्विट ( Anand Mahindra Tweet ) :महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतः इडली अम्माला तिचे नवीन घर मिळाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांना दिलेले वचन आता मदर्स डेच्या दिवशी पूर्ण झाले आहे. व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, 'मदर्स डेनिमित्त इडली अम्माला भेट देण्यासाठी वेळेत घराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे खूप खूप आभार. ती आईच्या पालनपोषण, काळजी आणि निःस्वार्थी गुणांचे मूर्त स्वरूप आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे भाग्य लाभले. यासोबतच त्यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.