महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mother Ran Away With Boyfriend : कलियुगी मातेचा पराक्रम ; मुलीच्या हुंड्याचे दागिने घेऊन आई प्रियकरासह फरार - दागिने घेऊन आई प्रियकरासह फरार उत्तराखंड

रुरकीच्या मंगळुरू पोलीस स्टेशन परिसरात, एक आई तिच्या मुलीच्या लग्नाच्या १० दिवस आधी तिच्या प्रियकरासह हुंडयाचे दागिने घेऊन पळून (Mother Ran Away With Boyfriend in Roorkee) गेली. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी महिला आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करत कारवाईची मागणी केली (Ran Away With daughter dowry jewellery) आहे.

Mother Ran Away With Boyfriend
मुलीच्या हुंड्याचे दागिने घेऊन आई प्रियकरासह फरार

By

Published : Dec 5, 2022, 10:03 AM IST

रुरकी (उत्तराखंड) : मंगळूर कोतवाली परिसरात एका कलियुगी मातेचा पराक्रम समोर आला आहे. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. घटना मंगळुरूमधील एका गावातील आहे. जिथे मुलीचे लग्न 10 दिवसांनी एका घरात होणार होते. लग्नसोहळ्याची तयारी जोरात सुरू होती. मुलीला हुंडा देण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने बनवले होते. मात्र लग्नाच्या 10 दिवस अगोदरच कलियुगी आई तिच्या प्रियकरासह हुंड्याचे दागिने घेऊन पळून(Mother Ran Away With Boyfriend) गेली.

महिला तरुणाच्या प्रेमात :आई प्रियकरासह पळून गेल्याचे कुटुंबीयांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी कोतवाली गाठून पोलीसांकडे न्यायाची विनंती केली. या महिलेच्या पतीचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला एका तरुणाच्या प्रेमात (Mother Ran Away With Boyfriend in Roorkee) पडली.

प्रियकरासह फरार :त्याचवेळी घरात महिलेच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू (Ran Away With Boyfriend) होती. लग्नाची वेळ जवळ आल्यावर घरच्यांनी हुंडा गोळा करण्यास सुरुवात केली. मुलीसाठी काही दागिनेही बनवले होते. मात्र मुलीची डोली उचलण्यापूर्वीच तिची आई तिच्या प्रियकरासह हुंड्याचे दागिने घेऊन पळून गेली. प्रियकरासह ती फरार झाल्याची माहिती मिळताच घरात खळबळ उडाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी मंगळुरू पोलीस ठाणे गाठून फरार महिला आणि तिच्या प्रियकराला पकडण्याची विनंती (Ran Away With daughter dowry jewellery) केली.

ABOUT THE AUTHOR

...view details