लखनऊ :उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मथुरा नदीच्या पात्रात वाहत आलेल्या भांड्यामध्ये नवजात बाळ आढळून आले आहे. स्थानिकांना हे बाळ दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या बाळाला वाचवले. त्यानंतर त्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. चाईल्डलाईन पथकही यावेळी सोबत होते. डॉक्टर किशोर माथुर यांनी बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले. या बाळाचे वजन तीन किलो असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.