नवी दिल्ली : वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा नैसर्गिक पालक असल्याने आडनाव ठरवण्याचा अधिकार आईला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा ( Suprime Court ) निर्णय बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने ( surname of second husband ) हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महिलेला तिच्या दुसऱ्या पतीचे नाव सावत्र वडील म्हणून कागदपत्रांमध्ये नोंदवण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, कागदपत्रांमध्ये महिलेच्या दुसऱ्या पतीचे नाव “सावत्र पिता” म्हणून समाविष्ट करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्देश “क्रूरपणाचा” होता. अशा मुलांच्या मानसिकतेवर या निर्णयाने काय परिणाम होईल, याचाही विचार त्यात झालेला नव्हता, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
बाळाची एकमेव नैसर्गिक पालक -कोर्टाने म्हटले आहे की, आई, बाळाची एकमेव नैसर्गिक पालक असल्याने, तिला मुलाचे आडनाव ठरवण्याचा अधिकार आहे. मुलाला दत्तक घेण्यासाठी सोडण्याचाही अधिकार आहे. पतीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करणारी आई आणि मुलाच्या मृत जैविक वडिलांचे पालक यांच्यातील मुलाच्या आडनावाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर बाळाची एकमेव नैसर्गिक पालक म्हणून आईला तिच्या नवीन कुटुंबात समाविष्ट करण्यापासून आणि आडनाव ठरवण्यापासून कायदेशीररित्या कसे रोखले जाऊ शकते, अशी विचारणा खंडपीठाने केली.