महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आईच्या चितेला अग्नी देताना रुग्णालयातून आला फोन, वडीलांचेही झाले कोरोनाने निधन - मुलींनी केले अंत्यसंस्कार

अनेक दिवसापासून त्यांच्यावर अलवर येथे उपचार सुरू होते. त्यांना दोन मुली असून दोन्ही मुली त्यांचा सांभाळ करतात. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुलगी सगुन तिच्या आईच्या चितेला अग्नी देत होती. त्याच वेळी तीला रुग्णालयातून फोन आला की वडिलांचेही निधन झाले आहे. मुलींनी रडत रडत आईला अग्नि दिली.

मुलींनी केले अंत्यसंस्कार
मुलींनी केले अंत्यसंस्कार

By

Published : May 5, 2021, 6:01 PM IST

Updated : May 6, 2021, 2:08 PM IST

अलवर (राजस्थान)- अलवरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूचे तांडव पहायला मिळत आहे. दररोज कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत आहे. याचदरम्यान, अलवरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अलवर शहरातील तीजकी स्मशानभूमीत एक मुलगी आपल्या आईचे अंत्यसंस्कार करताना पहायला मिळाले आहे. त्याचवेळी तीला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी कळते. ही बातमी त्या मुलीसोबत इतरही लोकांना थक्क करणारी ठरली. आपल्या आई-वडिलांना मुलींनी अग्नी देताना पाहून सर्वांचे डोळे भरून आले. मृतांचा मुलगा परदेशात नोकरी करतो. कोरोनामुळे तो आई-वडिलांना अग्नीही देऊ शकला नाही.

मुलींनी केले अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे राहणारे 75 वर्षीय राजेंद्र कुमार यांना काही दिवसांपूर्वी अलवरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यांना यकृत रोग होता. दरम्यान, त्यांची 70 वर्षीय पत्नी सुमनची प्रकृती खालावली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा अमेरिकेत नोकरी करतो. त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी आपल्या वडिलांना दिल्लीत आणले. तेथे बेड नसल्यामुळे करणने वडिलांना अलवरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनंतर आईची प्रकृतीही ढासळली. तीलाही अलवरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अलवर येथे उपचार सुरू होते. त्यांना दोन मुली असून दोन्ही मुली त्यांचा सांभाळ करतात. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुलगी सगुन तिच्या आईच्या चितेला अग्नि देत होती. त्याच वेळी तीला रुग्णालयातून फोन आला की वडिलांचेही निधन झाले आहे. मुलींनी रडत रडत आईला अग्नी दिली.

आईचे अंत्यसंस्कार चालू होते की थोड्या वेळाने वडिलांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका आली. गॅस मशीनने मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या मुलीने वडिलांना अग्नी दिला. अंत्यसंस्कार गॅस दहनभूमीच्या सहाय्याने करण्यात आले. हे सर्व पाहिल्यावर, नगर परिषद पथकातील सदस्य आणि तेथे उपस्थित लोकांच्या डोळ्यातही अश्रू दिसून आले. मुलींनी रडत रडत सांगितले की, आपला भाऊ अमेरिकेत नौकरी करतो. कोरोनाच्या आजारामुळे आई-वडील आजारी असतानाही तो येऊ शकला नाही. विमान प्रवासामुळे अडचणी आल्या.मुलगी सुगन आणि इतर बहिणींनी पालकांचा सांभाळ केला आहे. त्यांनीच वडिलांना रुग्णालयात दाखल केले होते. याचदरम्यान मंगळवारला दोघांचे निधन झाले. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींनी मुलाची कर्तव्य पार पाडली. या घटनेविषयीज्यांनी ऐकले त्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा -कर्नाटकात दीड तासात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू; ऑक्सिजन मिळाला नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

Last Updated : May 6, 2021, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details