नवी दिल्ली : 8 मार्च रोजी जगभरात 'जागतिक महिला दिन' साजरा केला जाणार आहे. या दरम्यान, अशा महिलांचे जगभरात स्मरण केले जाते, ज्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. किंवा आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगात आपली ओळख निर्माण केली आहे. आज महिला दिनानिमित्त महिलांनी देश आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून महिला सक्षमीकरणावर आपण चर्चा करणार आहोत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतीय राजकारणातील अशा यशस्वी महिलांची माहिती देत आहोत, ज्यांनी आपल्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेच्या बळावर देशात स्थान मिळवले आणि आजही लोक त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. या महिलांमध्ये अश्या अनेक महिलांचाही समावेश आहे, ज्या आज आपल्यामध्ये हयात नाहीत, पण त्यांच्या कार्यामुळे त्या कायम स्मरणात राहतील. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान मिळविलेल्या महिला आणि देशाच्या संसदेत किंवा विधानसभेत आवाज उठवणाऱ्या महिलांची माहिती देण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत' करीत आहे.
1. इंदिरा प्रियदर्शिनी - आपल्या देशाच्या राजकारणातील प्रसिद्ध महिलांमध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधान आणि आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणार्या इंदिरा गांधी, ज्यांनी अनेक वर्षे देशाच्या पंतप्रधान म्हणून आपल्या इच्छाशक्ती आणि कार्यशैली जोरावर दमदार काम केले. त्यांना देशाचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. इंदिरा गांधींनीही पक्षात विशेष ओळख निर्माण केली. इंदिरा गांधींनी देशाच्या राजकारणात अशी अनेक कामे केली, जी लोक वेळोवेळी लक्षात ठेवतात. पाकिस्तानचे दोन विभाग केल्याबद्दल इंदिरा गांधी सदैव स्मरणात राहतील.
2. द्रौपदी मुर्मू - द्रौपदी मुर्मूयांना देशाच्या पहिल्या दलित आणि आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान आहे. देशातील सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत, ज्यांना भारतीय जनता पक्षाने सर्वोच्च स्थानी आणले आहे. द्रौपदी मुर्मूचा राजकीय प्रवास 2000 मध्ये आमदार म्हणून सुरू झाला. 2002 मध्ये नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये त्यांना मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री करण्यात आले. काही दिवसांनी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले. 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत त्यांना झारखंडचे राज्यपाल बनवण्यात आले. त्यानंतर देशाच्या 15व्या राष्ट्रपती बनून सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला ठरल्या.
3. सुषमा स्वराज - सुषमा स्वराज या भारतीय जनता पक्षाच्या मजबूत नेत्यांपैकी एक होत्या, ज्यांनी पक्षाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी सुरुवातीपासूनच कठोर परिश्रम केले. भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला भक्कम मार्गाने उभे करण्यात सुषमा स्वराज यांचा विशेष वाटा होता. पक्षाच्या महिला नेत्यांमध्ये त्या अव्वल होत्या. भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या प्रत्येक सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली. सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही पार पाडली आणि काही काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. परराष्ट्र मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालयासह सर्व मंत्रालयांमध्ये सुषमा स्वराज यांनी केलेले काम आजही लोकांना आठवते.
4. निर्मला सीतारामन - निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री असल्याचं म्हटलं जातं, ज्यांनी पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून आपला अर्थसंकल्प सादर केला. 2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत राजकीय प्रवास सुरू केला आणि मोदी सरकारमध्ये प्रथम संरक्षण मंत्री आणि नंतर अर्थमंत्री बनून आपली क्षमता आणि कार्यशैली दाखवली. फोर्ब्सच्या वार्षिक यादीत निर्मला सीतारामन यांना जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
5. सोनिया गांधी - सोनिया गांधी आपल्या देशातील एक मजबूत राजकीय महिला म्हणून ओळखल्या जातात. राजीव गांधींच्या पत्नी म्हणून नेहरू गांधी घराण्यात आलेल्या सोनिया गांधी यांनी पक्षाच्या लोकांच्या विनंतीवरून काँग्रेस पक्षाची धुरा तर घेतलीच, पण त्या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक काळ महिला अध्यक्षाही झाल्या. राजीव गांधींच्या हत्येनंतरही आपला ठसा उमटवला. काँग्रेसच्या राजवटीत त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा म्हणूनही काम केले. काँग्रेसला एकसंध ठेवण्यात त्या अपयशी ठरल्या. त्यांच्या कार्यकाळात पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि सर्व आपापल्या राज्यात अतिशय मजबूत स्थितीत आहेत.
6. सुमित्रा महाजन - सुमित्रा महाजन यांची भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये गणना होते आणि लोक त्यांना प्रेमाने ताई म्हणून हाक मारतात. पक्षीय राजकारणात त्यांनी मोठे स्थान मिळवले आणि मोठा ठसा उमटवला. सुमित्रा महाजन या पहिल्यांदा 1989 मध्ये इंदूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सलग आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. असा पराक्रम करणाऱ्या त्या एकमेव महिला खासदार आहेत, ज्यांनी एकाच लोकसभा मतदारसंघातून सलग आठ निवडणुका जिंकल्या आहेत. यानंतर 2014 ते 2019 या काळात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापनेदरम्यान त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले.