महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, दिला मोठा निधी - MORTH on Maharashta

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक व राजमार्ग खात्याने महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. मोर्टने २०२०-२१ या सालामध्ये ८२९ किलोमीटरच्या रस्ते प्रकल्पांना मंजूरी दिली आहे.

MORTH has approved 54 Projects of 829 km cost Rs 4590 Cr in 2020-21 for Maharashta
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, दिला मोठा निधी

By

Published : Apr 5, 2021, 2:39 AM IST

नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक व राजमार्ग खात्याने महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. मोर्टने २०२०-२१ या सालामध्ये ८२९ किलोमीटरच्या रस्ते प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यात ५४ प्रकल्पांना मंजूरी मिळाली असून याचा खर्च ४ हजार ५९० कोटी रुपये इतका आहे. नितीन गडकरी यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी या निधीची घोषणा केली आहे. रस्त्याची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी ४ हजार ५९० कोटी रुपयांचा निधी गडकरींनी देऊ केला आहे. गडकरी यांनी ट्विटरवरुन विविध महामार्गांच्या कामांची घोषणा केली. #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली गडकरी यांनी राष्ट्रीय आणि राज्यमार्गांच्या कामाबाबत घोषणा केल्या आहेत.

येत्या वर्षात टोलनाके हटवणार -

येत्या एका वर्षात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. यावर सरकार काम करत आहे. टोल बूथवर प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने फास्टॅगची सोय केली. जेणेकरून प्रवाशांना आपला टोल भरता येईल आणि सहजपणे टोलनाका सोडता येईल. ही एक ऑनलाईन टोलनाका देय सुविधा आहे, जी तुम्हाला रोखीऐवजी डिजिटल करणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी सांगितलं आहे.

जेवढा रस्ता वापराल, तेवढाच टोल द्यावा लागेल -

रस्ते प्रकल्प कराराचा लाभ घेण्यासाठी मागील सरकारमध्ये असे टोल ब्लॉक बनविण्यात आले होते. हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. जर आता कारवाई केली तर रस्ता बनविणारी कंपनी भरपाईची मागणी करेल, असेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सर्व टोलनाके दूर होतील. महामार्गावर प्रवेश केल्यानंतर जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने कॅमेरा फोटो काढेल. लोकांनी जेवढ्या अंतराचा प्रवास केला. तेवढेच पैसे द्यावे लागतील. अशा तंत्रज्ञानावरही सरकार काम करत आहे, असे गडकरी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -नादच खुळा! हॉट मॉडेलच्या एन्ट्रीने जौनपूर जिल्हा परिषद पंचायत निवडणूक रंगात

हेही वाचा -'पंतप्रधान मोदी सिंडिकेट नंबर 1, तर अमित शाह सिंडिकेट नंबर 2'; ममता बॅनर्जी यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details