महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या नवीनचे पार्थिव बंगळुरूत दाखल, मुख्यमंत्री बोम्मई यांनी वाहिली श्रद्धांजली - Naveen deadbody Bengaluru

युक्रेनमध्ये बॉम्ब शेलिंगमध्ये 1 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कर्नाटकातील नवीन शेकरप्पा ग्यानागौदर या विद्यार्थ्याचे पार्थिव आज बंगळुरू विमानतळावर पोहचल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई ( Cm Bommai pay respect to Naveen Shekarappa Gyanagoudar ) यांनी दिली.

cm Bommai pay respect to Naveen Shekarappa
नवीन शेकरप्पा ज्ञानगौदर

By

Published : Mar 21, 2022, 9:57 AM IST

Updated : Mar 21, 2022, 10:05 AM IST

बंगळुरू (कर्नाटक) - युक्रेनमध्ये बॉम्ब शेलिंगमध्ये 1 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कर्नाटकातील नवीन शेकरप्पा ग्यानागौदर या विद्यार्थ्याचे पार्थिव आज बंगळुरू विमानतळावर पोहचल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई ( Cm Bommai pay respect to Naveen Shekarappa Gyanagoudar ) यांनी दिली. नवीनचे पार्थिव मिळाल्याबद्दल बोम्माई यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विदेश मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले आहे.

मुख्यमंत्री बोम्मई

हेही वाचा -केजरीवाल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या 'या' निर्णयाचे केले कौतुक

मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह नवीनला श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद सांधला. संकटाच्या काळी देशाची ताकद आणि पराक्रम ओळखला जातो. संकटकाळात नवीनचे पार्थिव आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद दाखवून दिली. नवीनचा पार्थिव आज आला असून आम्ही सर्व व्यवस्था केली असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान पार्थिव आणल्याबद्दल नवीनच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री बोम्मई यांचे आभार मानले आहे. नवीनचा धाकटा भाऊ हर्षा शेखरप्पा ग्यानागौदर हा केम्पेगौडा विमानतळावर उपस्थित होता. त्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

हेही वाचा -WWII : वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारताची ब्रिटिश सैनिकांच्या नातेवाईकांना मदत

Last Updated : Mar 21, 2022, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details