महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 12, 2023, 2:12 PM IST

ETV Bharat / bharat

Notice To Bajrang Bali : हे देवा..! चक्क बजरंग बलीलाच अतिक्रमणाची नोटीस!

मुरैना येथे रेल्वेने बजरंग बलीलाच नोटीस पाठवत अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. या अजब नोटीसमध्ये बजरंग बलीने रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे रेल्वे विभागाने लिहिले आहे.

Notice To Bajrang Bali
बजरंग बलीला अतिक्रमणाची नोटीस

मुरैना(मध्य प्रदेश) : मध्य प्रदेश रेल्वे विभागाचा एक अजब कारनामा समोर आला आहे. विभागाने चक्क बजरंग बलीलाच नोटीस बजावली आहे! आश्‍चर्याची बाब म्हणजे, या नोटीसमध्ये रेल्वेने बजरंग बलीने अतिक्रमण केल्याचे सांगत 15 दिवसांत अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. अतिक्रमण न हटविल्यास रेल्वे कारवाई करेल आणि जेसीबीचा खर्च बजरंग बलीकडून वसूल केला जाईल, असा इशाराही रेल्वेकडून देण्यात आला आहे.

मंदिर रेल्वेच्या जमिनीवर : ग्वाल्हेर-श्योपूर ब्रॉडगेज लाइनचे काम सुरू आहे. मुरैना जिल्ह्यातील सबलगड तहसीलमध्ये ब्रॉडगेज लाइनच्या मध्यभागी हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच रेल्वे विभागाने बजरंग बलीला ही अजब नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बजरंग बलीने रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे रेल्वे विभागाने लिहिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रेल्वेच्या या पत्रात सबलगडच्या रेल्वे जमिनीवर अतिक्रमण केल्याचे लिहिले आहे. ही नोटीस दिल्यानंतर 7 दिवसांत रेल्वेच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून तुम्ही रेल्वेची जमीन रिकामी करा, अन्यथा तुमचे अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जाईल, असे नोटीशीत लिहिले आहे. असे केल्यास नुकसानीची आणि खर्चाची जबाबदारी तुमची असेल असेही या नोटीशीत म्हटले आहे. बजरंग बलीला दिलेल्या या नोटीसची प्रत सहाय्यक विभागीय अभियंता ग्वाल्हेर आणि जीआरपी स्टेशन प्रभारी ग्वाल्हेर यांनाही पाठवण्यात आली आहे.

हे आहे नोटीसचे सत्य : ही रेल्वे नोटीस झाशी रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभाग अभियंता जौरा आलापूर यांच्या वतीने सबलगढ येथे बजरंग बलीच्या नावाने ८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली आहे. ही नोटीस सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या नोटिशीचे सत्य झाशी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज माथूर यांनी फोनवर सांगितले की, ही नोटीस पूर्णपणे बरोबर आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, नोटीसमध्ये चुकून मंदिराच्या मालकाऐवजी भगवान बजरंग बलीचे नाव लिहिले गेले आहे. त्यात सुधारणा केली जात आहे.

नागा साधू शिवगरीबापूला कोठडी : जुनागडमध्ये भवनाथ पुराण आखाड्याच्या पीठाधीश्वर स्वाध्वी जयश्रीकानंद यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या नागा साधू शिवगरीबापूला पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे. स्वाध्वी जयश्रीकानंद यांना जुनागड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. नागा साधू शिवगरीबापूने तीन वर्षांपूर्वी भवनाथ परिसरात आणखी एका साधूवरही हल्ला केला होता, ज्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :Adil Khan Durrani Rape Case : राखी सावंतचा पती आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details