भोपाळ :मध्य प्रदेशच्या मोरेनामध्ये गेल्या आठवड्यात विषारी दारू पिल्यामुले २४ जणांचा बळी गेला होता. गेल्या मंगळवारी ही दुर्घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी अवैधरित्या दारू तयार करुन विकाणाऱ्यांचा शोध सुरू केला होता. यामध्ये छेरा या गावात असणाऱ्या मुकेश किरार या दारू माफियाची दोन घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
सात जणांवर गुन्हा, बक्षीसही जाहीर..
याप्रकरणी आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकारने या सर्वांवर बक्षीसही जाहीर केले आहे, अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली आहे. जौऊराचे उपविभागीय दंडाधिकारी नीरज शर्मा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस. बी. एस. रघुवंशी यांच्या पथकाने किरारची घरे जमीनदोस्त केली. ही घरे अवैध जमीनीवर बांधण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आतापर्यंत २४ ठार, कित्येकांना अंधत्व..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारू बनवनारी ही टोळी या गावामधूनच सर्व व्यवहार करत. या दारूमुळे आतापर्यंत २४ जणांचा जीव गेला असून, कित्येक लोकांना अंधत्व आले आहे. या सर्वांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील बळींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी भेट दिल्यानंतर सरकारने याप्रकरणी एका त्रिसदस्यीय पथकाची नेमणूक केली होती.
आतापर्यंत याप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे पाच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, एका पोलिस अधिकाऱ्यासह, जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.
या आधीही झाला होता १६ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशात विषारी दारूमुळे मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. 14 ऑक्टोबर 2020 रोजी उज्जैनमध्ये विषारी दारू पिऊन 16 जणांचा मृत्यू झाला होता. दारू तयार करण्यासाठी इथेनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळले गेले होते. अधिकारी प्रिती गायकवाड यांनी याबाबत तपास केला होता. मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी विष मानले जाते. त्याचे 10 एमएल इतके प्रमाण मनुष्याला आंधळे करु शकते. नगरपालिका कर्मचारी युनुस सिकंदर हे दोघे याप्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी पालिका कार्यालयाच्या गच्चीवर ही दारु बनवली होती.
हेही वाचा :तामिळनाडूत जलिकट्टू खेळादरम्यान तरुणाचा मृत्यू