चंदीगढ - हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी हिसारच्या ओपी जिंदल मॉडर्न स्कूलमध्ये चौधरी देवीलाल संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. तेव्हा रामायण टोल व सतरोड कालव्याजवळ आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा विरोध दर्शवला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक झाली. यात जवळपास 50 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.
शेतकर्यांना मुख्यमंत्री रुग्णालयात येण्याची माहिती मिळताच त्यांनी जिंदल शाळेकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांना रुग्णालयाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता वातावरण तापले. पोलीस आणि आंदोलन करणार्या शेतकऱ्यांमध्ये चकमक झाली.