पानिपत ( हरियाणा ) -टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले ( Neeraj Chopra Won Gold In javelin ) . त्यानंतर 7 ऑगस्ट हा दिवस देशात भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली ( National Javelin Throw Day ). त्यामुळे देशात आज पहिला भालाफेक दिन साजरा करण्यात आला ( First Javelin Throw Day ). हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंडारा या छोट्याशा गावात जिथे नीरज हा एकमेव खेळाडू होता. आज त्याच गावातले ७० तरुण भालाफेक खेळाचा सराव करत आहेत.
भालाफेक खेळाडूंमध्ये सातत्याने वाढ - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भालाफेक खेळाला नवी ओळख मिळाली. आता या खेळात खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. गावागावापासून ते शहरांपर्यंत मुले-मुली भालाफेकचा सराव करत आहेत. गेल्या वर्षी शिवाजी स्टेडियम पानिपत येथे झालेल्या जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत 250 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता ( Javelin Competition in Panipat ). याचे आयोजकांनाही आश्चर्य वाटले. नीरजची चुलत बहीण नॅन्सी हिनेही या स्पर्धेत पदक जिंकले. याशिवाय अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले.