अहमदाबाद -रविवारी संध्याकाळी अहमदाबाद शहरातील संपूर्ण परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचबरोबर साणंद तालुक्यातील विरोचननगर गावाला वादळाचा मोठा फटका बसला. ज्यामध्ये संपूर्ण गावातील 20 हून अधिक घरांची पडझड झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्याने आजूबाजूच्या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय, वादळाच्या तडाख्याने 8 जण जखमी झाले, त्यांना 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने कहर केला आहे. राज्यात अहमदाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे. काल सानंद तालुक्यात मोठा पाऊस झाला. या पावसात विरोचननगरमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. काही कच्ची घरे या पावसाने जमीनदोस्त केली.