महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 5, 2021, 10:41 PM IST

ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश : दहा वर्षांहून कमी वयोगटातील २ हजार मुलांना कोरोनाची लागण

ज्ज्ञांच्या मते लहान मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत अधिक प्रतिकारक्षमता असते. त्यामुळे मुले कोरोनावर एक ते दोन आठवड्यात मात करतात. असे असले तरी पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा तज्ज्ञ सल्ला देतात.

हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश

शिमला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हिमाचल प्रदेशमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. छोटे पवर्त असलेल्या भागांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळत आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १० वर्षांहून कमी वयाच्या सुमारे २ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते लहान मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत अधिक प्रतिकारक्षमता असते. त्यामुळे मुले कोरोनावर एक ते दोन आठवड्यात मात करतात. असे असले तरी पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा तज्ज्ञ सल्ला देतात. कोरोनाबाधितांच्या संपर्कात लहान मुले येऊ नये, याची काळजी घ्यावी, असेही तज्ज्ञ सांगतात.

दहा वर्षांहून कमी वयोगटातील २ हजार मुलांना कोरोनाची लागण

हिमाचलमध्ये २०२५ मुलांना कोरोनाचा संसर्ग

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शून्य ते १० वर्षापर्यंतच्या २०२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ ते २० वर्षापर्यंतच्या ७,४४१ मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

हेही वाचा-माणुसकी ओशाळली! भररस्त्यात महिलेला पतीच्या मृतदेहासह सोडून ड्रायव्हरचा पोबारा

बालकांनाही कोरोनाचा धोका-

एक वर्षांहून कमी वयाच्या बालकांनाही कोरोनाचा मोठा धोका आहे. कारण, त्यांच्यामध्ये पुरेशी प्रतिकारक्षमता नसते.

ही आहेत लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे

  • ताप आणि थंडी वाजणे
  • नाक बंद होणे अथवा वाहणे
  • खोकला, घशाची खवखव होणे
  • श्वास घेण्यात त्रास होणे
  • थकवा, डोकेदुखी होणे
  • अंगदुखी होणे
  • मळमळ होणे
  • डायरिया, भूक कमी लागणे
  • गंध घेण्याची कमी क्षमता होणे
  • पोटात दुखणे

हेही वाचा-कोरानाची तिसरी लाट टाळणे शक्य नाही- केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा

लक्षण येताच डॉक्टरांचा घ्यावा सल्ला

हिमालच प्रदेशच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रमेश म्हणाले, की लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळताच डॉक्टांकडून मदत घ्यावी. शक्य तेवढे मुलांना घरी किंवा इतर लोकांपासून दूर ठेवा. शक्य असेल तर मुलांसाठी वेगळे बेडरुम अथवा बाथरुमची सोय करावी.

हिमाचल प्रदेशमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के

हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. आजतागायत ८३,६७९रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. असे असले तरी कोरोनाची दुसरी लाट ही वेगाने पसरत आहेत. त्यामुळे टेस्टिंग आणि लसीकरण वेगाने करण्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details