रायपूर :प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी सुमारे 2 किमी 6 हजार किलोपेक्षा जास्त गुलाबाच्या फुलांची नासाडी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय 85 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी वढेरा शनिवारी छत्तीसगडमधील नया रायपूर येथे पोहोचल्या. यावेळी प्रियांकाच्या स्वागतासाठी विमानतळासमोरील रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा जाड थर टाकण्यात आला.
कार्यकर्त्यांनी केले प्रियंकाचे भव्य स्वागत : यावेळी रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा केलेल्या लोककलाकारांनीही सादरीकरण केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख मोहन मरकाम, पक्षाच्या इतर नेत्यांनी प्रियंका गांधी वड्रा यांचे स्वागत केले. सकाळी 8.30 च्या सुमारास प्रियंका गांधी स्वामी विवेकानंद विमानतळावर पोहोचल्या. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा नावच्या जोरदार घोषणा दिल्या.
प्रियंका गांधीवर गुलाबांचा वर्षाव : प्रियांका गांधी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत कारमधून विमानतळावरून बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत इतर नेत्यांच्या वाहनांचा ताफाही होता. यावेळी गांधींनी शहरात ठिकठिकाणी उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. मागच्या सीटवर बसलेल्या सीएम बघेल यांनीही हात हलवून समर्थकांना प्रोत्साहन दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे विमानतळापासून सुमारे 2 किमीपर्यंत रस्त्यावर गुलाबांच्या फुलांचा सडा टाकण्यात आला होता. तसेच कार्यक्रमस्थळी पक्षाच्या समर्थकांनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावरही गुलाबांचा वर्षाव केला होता.