महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Telangana Assembly Election : मतदानापूर्वी तेलंगणात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Telangana Assembly Election : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणातून १०० कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या आधी १०३.८९ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली होती. यावर्षी हा आकडा पार केला जाणार आहे. (100 crore Rs seized in Telangana)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 9:02 PM IST

More than 100 crore Rs seized in Telangana
More than 100 crore Rs seized in Telangana

हैदराबाद Telangana Assembly Election :तेलंगणात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू होऊन जेमतेम एक आठवडा झाला असताना, राज्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दारू आणि सोनं-चांदी जप्त करण्यात आलंय. (100 crore Rs seized in Telangana)

इतक्या कोटींचा मुद्देमाल जप्त : निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातून केवळ आठ दिवसांत रोख, दारू, ड्रग्ज, सोने आणि चांदीच्या जप्तींनी तब्बल १०० कोटींचा टप्पा ओलांडलाय. निवडणूक आयोगानं जवळपास ५६ कोटी रुपये रोख, ३८.४५ कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिरे, ३.४२ कोटी रुपये किमतीचा गांजा, २.६ कोटी रुपये किमतीची दारू आणि ७० लाख रुपये किमतीच्या इतर वस्तू, असा एकूण १०१ कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या आधी एकूण १०३.८९ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली होती. यावर्षी वसुलीचा हा आकडा पार केला जाणार आहे.

अवैध वाहतूक रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना : आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोलिसांनी राज्यात ३७३ फ्लाइंग स्क्वॉड्स (FS), ३७४ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स (SST), ९५ राज्य अंतर्गत सीमा चेक पोस्ट्स याशिवाय स्थानिक पोलिसांच्या फिरत्या पथकांची स्थापना केली. रोख रक्कम, मौल्यवान धातू, दारू इत्यादींची अवैध वाहतूक रोखणं हा यामागचा उद्देश आहे.

आचारसंहितेचं पालन करण्याची विनंती : तेलंगणा पोलिसांनी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आचारसंहितेचं पालन करण्याची विनंती केली आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.

हेही वाचा :

  1. Cocaine Caught in Mumbai : मुंबईत 70 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई, चौघांना अटक
  2. Gold Smuggling Case Mumbai: 'डीआरआय'ने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा केला पर्दाफाश, ७ किलो सोने जप्त
  3. Mahadev Book App Scam : ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला मुंबई विमानतळावरून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details