गुजरात : (Morbi Incident ) मोरबीचा झुलता पूल कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व नऊ आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. जामीन द्यायचा की नाही याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जासंदर्भातील सुनावणीदरम्यान एफएसएल टीमचा प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. ज्यात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी पूल कोसळला त्या दिवशी 3,165 तिकिटांची विक्री ( Sale of tickets ) झाली होती. ( Corruption Criminal Negligence Big Reveal In Fsl Report )
30 ऑक्टोबर रोजी 3165 तिकिटे : मोरबीचे सरकारी वकील विजयभाई जानी यांनी सांगितले की, आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एफएसएलचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पुलाच्या दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी ओरेवा ग्रुपवर सोपवण्यात आली होती. अपघाताच्या दिवशी 30 ऑक्टोबर रोजी 3165 तिकिटे देण्यात आली होती. इतके लोक पुलावरून गेले तर काय होईल याचा विचार तिकीट देणाऱ्याने केला नाही. पुलावर दोन तिकीट काउंटर सुरू होते आणि दोन्ही व्यक्तींना एकमेकांच्या काउंटरवरून किती तिकीट निघाले याची माहिती नव्हती.