मुरादाबाद : मुरादाबादमधील हिंदू कॉलेजच्या गेटवर काल दुपारी मोठा गोंधळ झाला. बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच थांबवले. कॉलेज प्रशासनाने त्यांना ड्रेस कोडमध्येच प्रवेश देण्याचे सांगितल्यावर विद्यार्थिनींनी विरोध सुरू केला. याची माहिती मिळताच समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन गोंधळ घातला. यावेळी ठिय्या आंदोलन करून महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थिनींना बुरखा घालून वर्गात जाण्याची परवानगी मागणारे निवेदन त्यांनी मुख्याध्यापकांना दिले.
सर्व विद्यार्थ्यांना ड्रेसमध्येच प्रवेश :हिंदू कॉलेजमध्ये १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना ड्रेसमध्येच प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी गेटवरच कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. बुधवारी दुपारी काही विद्यार्थिंनी बुरख्यात आल्या. महिला प्राध्यापिकेने त्यांना थांबवले. त्यांनी विद्यार्थिनींना ड्रेसमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतरच प्रवेश दिला जाईल असेही त्यानी सांगितले.
कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल :काही वेळातच विद्यार्थी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अस्लम चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे पोहोचले. ते गेटवरच धरणे अंदोलन धरून बसले. बुरख्यात कॉलेजला जाणे हा त्यांचा हक्क असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. या गोंधळाची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थिनींशी चर्चा केली.
विद्यार्थी संघटनेच्यावतीने मुख्याध्यापकांना निवेदन : विद्यार्थी संघटनेच्यावतीने मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींना बुरखा घालून वर्गात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. कॉलेजच्या गेटवर विद्यार्थिनींचा बुरखा काढणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थिनींची संख्या कमी होईल. हिंदू कॉलेजचे चीफ प्रॉक्टर डॉ.ए.पी.सिंग म्हणाले की, 1 जानेवारीपासून कॉलेजमध्ये ड्रेस घालून येणे बंधनकारक असल्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. हा नियम सर्वांना लागू आहे. कॉलेज प्रशासनाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा. कॉलेजच्या गेटवर विद्यार्थिनींसाठी एक खोली करण्यात आली आहे. विद्यार्थिनी येथे बुरखा बदलू शकतात.