महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Moosewala Murder : मुसेवाला खून प्रकरणात मोठे यश, हत्येचा सूत्रधार गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियातून ताब्यात - Punjabi singer Sidhu Musewala

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Punjabi singer Sidhu Musewala ) यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गुंड गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ( Goldy Brar Detained In California )

Moosewala Murder
मुसेवाला खून

By

Published : Dec 2, 2022, 9:21 AM IST

Updated : Dec 2, 2022, 10:04 AM IST

कॅलिफोर्निया :पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Punjabi singer Sidhu Musewala ) यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ( Goldy Brar Detained In California )

अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड : गोल्डी ब्रार ही अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड आहे. मूसावाला खून प्रकरणाशिवाय त्याच्यावर फरीदकोटचा गुरलाल कुस्तीपटू आणि डेरा प्रेमी हत्या प्रकरणासह अनेक गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डी कॅनडाला गेला होता आणि तिथून तो अमेरिकेत पोहोचला होता. ब्रार अमेरिकेत जाऊन ड्रग्जचे काम करत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफबीआयने त्याची चौकशी केली आहे. येथे त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले आहेत.

मुसेवाला यांच्या वडिलांनी बक्षीस जाहीर केले होते :यापूर्वी मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी गोल्डी ब्रारला अटक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जो कोणी गोल्डीचा पत्ता सांगेल, त्याची जमीन विकून त्याला दोन कोटी रुपये देऊ, असे तो म्हणाले होते. याच्या एका दिवसानंतर गोल्डीच्या अटकेची बातमी समोर आली आहे. मात्र, याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

कोण आहे गोल्डी ब्रार :गोल्डी ब्रार हा मूसवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात बसून गोल्डी मुसेवाला प्रकरणातील सर्व सूचना देत होता. हत्येनंतर लगेचच गँगस्टर गोल्डी ब्रार याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इंटरपोलने ब्रार यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. पंजाबमध्ये खंडणीचे रॅकेट चालवल्यानंतर तो कॅनडातूनच राज्यात आपले हिट पथक आणि व्यवसाय चालवतो, असे सांगितले जाते. त्याच्यावर भारतात खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या :29 मे रोजी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. हत्याकांड घडले तेव्हा मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून कुठेतरी जात होते. दरम्यान, सहा हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला आणि गोळीबार सुरू केला. या प्रकरणी चार शूटर्सना अटक करण्यात आली आहे, तर दोन चकमकीत ठार झाले आहेत.

Last Updated : Dec 2, 2022, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details