नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होईल आणि ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. ही माहिती अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश लोकसभा आणि राज्यसभेकडून जारी केले आहेत. लोकसभेने जारी केलेल्या आदेशानुसार 17 व्या लोकसभेचे सहावे अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी संपेल.
राज्यसभेच्या अधिकृत आदेशानुसार, राष्ट्रपतींनी 19 जुलै रोजी राज्यसभेची बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी संपेल. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाईल आणि अंतरांची काळजी घेतली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ताज्या आकडेवारीनुसार लोकसभेच्या 444आणि राज्यसभेच्या 218 सदस्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निवडक खासदारांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत.