नवी दिल्ली : मणिपूर घटनेवरुन विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू केला आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी केली आहे. मात्र भाजपने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाहीत, चर्चेलाही ते तयार नव्हते. मात्र आता विरोधक मणिपूर प्रकरणावरुन संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा टाळत आहेत. त्यांची काय मजबुरी आहे, असा सवालही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केला आहे.
उद्धव ठाकरेंवर पालघर प्रकरणावरुन हल्लाबोल :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगलाच हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंच्या निर्घृण हत्येचे उत्तर देऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरे हे चर्चेलाही तयार नव्हते. मात्र आता मणिपूर प्रकरणावरुन विरोधक गदारोळ करत आहेत. अनुराग ठाकूर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरण उकरुन काढत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता याप्रकरणी पुन्हा वाद ओढवण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला मणिपूर हिंसाचाराच्या गदारोळात सुरू झाले आहे. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधक संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. मात्र विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी लावून धरली आहे.