महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

monkeypox : कोरोनाचे संकट असताना अमेरिकेत मंकीपॉक्सची एन्ट्री...असा पसरतो विषाणू - Monkeypox virus infection

सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाने त्रस्त आहे. भारतात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशात आता एका दुर्मिळ आणि प्राणघातक विषाणूची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास शहरात मंकीपॉक्स संसर्ग झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. हा देखील कोरोप्रमाणे संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींमध्ये पसरतो.

monkeypox
मंकीपॉक्स

By

Published : Jul 22, 2021, 8:24 PM IST

हैदराबाद -सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाने त्रस्त आहे. भारतात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशात आता एका दुर्मिळ आणि प्राणघातक विषाणूची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास शहरात मंकीपॉक्स संसर्ग झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. हा देखील कोरोप्रमाणे संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींमध्ये पसरतो. 2003 मध्ये अमेरिकेच्या काही शहरांमध्ये मंकीपॉक्स पसरण्याच्या काही घटना समोर आल्या होत्या.

हेही वाचा -kargil vijay diwas: हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भारतीय सेनेने काढली 400 किं.मीची बाईक रॅली

चिकनपॉक्स सारखा आहे विषाणू, मात्र घातक

तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्स विषाणू भारतात आढळणाऱ्या चिकनपॉक्स सारखा आहे. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये मोठमोठाले दाने किंवा फोडं येतात. जो पण या विषाणूने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्याला पण मंकीपॉक्स होण्याचा धोका बळावतो. हा जुना विषाणू आहे, मात्र अमेरिकेत याच्या प्रवेशाने आरोग्य संगठना सतर्क झाल्या आहेत.

2003 मध्ये अमेरिकेत केला होता कहर

1970 मध्ये पहिल्यांदाच मनुष्यांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाचे प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत या आजाराने अनेक अफ्रिकी देशांमध्ये कहर केला आहे. 2003 मध्ये या विषाणूचे अमेरिकेत अस्तित्व समोर आले होते. त्यानंतर 18 वर्षांनंतर हा आजार पुन्हा समोर आल्याने अमेरिकेचा आरोग्य विभाग थोडा अस्वस्थ झाला आहे. या सर्व वर्षांत भारतासह आशियाई देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुष्टी झालेली नाही.

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो विषाणू

आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, संसर्ग झालेल्या प्राण्याच्या रक्ताच्या किंवा शारीरिक द्रवांच्या संपर्कात येण्याने मंकीपॉक्स होण्याचा धोका असतो. आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, हा विषाणू प्राण्यांशी संबंधित आहे, मात्र तो मनुष्यांमध्ये पसरण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. या आजाराच्या लक्षणांविषयी सांगताना आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ आणि स्नायू दुखने याबरोबरच कमजोरीचा अनुभव होतो. याव्यतिरिक्त रुग्णाच्या शरीरावर मोठ्या आकाराचे दाने पण होऊ शकतात.

हेही वाचा -कर्नाटकात नेतृत्व बदलाची शक्यता; बीएस येडीयुरप्पा यांच मुख्यमंत्री पद जाणार?

ABOUT THE AUTHOR

...view details