महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Monkey Fever Disease : केरळात कोरोनानंतर माकड ताप आजाराचा धोका; जाणून घ्या काय आहे हा रोग - माकड ताप

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील थिरुनेल्ली ग्रामपंचायतीमधील पानवली आदिवासी वस्तीतील २४ वर्षीय व्यक्तीला एका नवीन रोगाची लागण झाली आहे. कायसनूर फॉरेस्ट डिसीज ( Kyasanur Forest Disease ) किंवा सामान्यतः माकड ताप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोगाची लागण ( Monkey fever reported in Wayanad ) झाली आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Monkey Fever Disease
माकड ताप

By

Published : Feb 10, 2022, 5:47 PM IST

वायनाड (केरळ) - केरळमधील वायनाड जिल्ह्यातील थिरुनेल्ली ग्रामपंचायतीमधील पानवली आदिवासी वस्तीतील २४ वर्षीय व्यक्तीला एका नवीन रोगाची लागण झाली आहे. कॅसनूर फॉरेस्ट डिसीज ( Kyasanur Forest Disease ) किंवा सामान्यतः माकड ताप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोगाची लागण झाली आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केरळात माकड तापाचा रुग्ण -

जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सकिना यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, त्या म्हणाला की, हंगामी ताप असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता. स्थानिक लोकांना सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे. त्यांनी सांगितले की, 24 वर्षीय तरुणाला माकड ताप नावाच्या रोगाची लागण झाली आहे. त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तो वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.

'रुग्णाची प्रकृती स्थिर'

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्याला कोणत्याही प्रकाराचा त्रास त्याला झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

माकड ताप रोगाचा पहिलाच रुग्ण -

केरळमध्ये चालू वर्षात माकड ताप या रोगाची नोंद झालेली ही पहिलीच घटना आहे असेही जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सकिना यांनी सांगितले.

काय आहे माकड ताप आणि कुठून आला?
कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) म्हणजे माकड तापाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१६ मध्ये आपले हातपाय पसरले. सुरुवातीला दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे शेकडो माकडे मृतावस्थेत सापडली. यानंतर माकड ताप लोकांमध्ये पसरू लागला. देशात सर्वप्रथम १९५७ साली तत्कालीन म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात क्यासनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला. त्यामुळे त्याला कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD), असे म्हटले जाते. बाधित किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेल्या गोचीड किवा पिसवा माणसाला चावल्यास हा आजार पसरतो. या आजाराने २०१६ पासून आजवर जिल्ह्यात २४ लोकांचा बळी घेतला आहे. १२ दिवस अथवा अधिक काळ ताप असणे, डोक्याच्या पुढील भागात तीव्र वेदना, नाक, घसा, हिरडय़ांतून प्रसंगी रक्तस्राव, अतिसार, उलट्या, खोकला, मान, कंबरदुखी, विष्ठेतून रक्त पडणे, सांधेदुखी, अशक्तपणा, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्सचे प्रमाण खालावणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. या रोगावर अद्याप कोणताही निश्चित उपाय सापडलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या भारतीय विषाणू संस्थेने या माकड रोगाला 'पब्लिक हेल्थ अलर्ट' म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा -सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट, अलर्ट राहण्याच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details