चेन्नई : मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले तामीळनाडूचे मंत्री सेंथील बालाजी यांना ईडीच्या कोठडीत असतानाच रडू कोसळले. यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ईडीचे अधिकारी मंत्री सेंथील बालाजी यांना टॉर्चर करत असल्याचा आरोप तामीळनाडूचे द्रमुकचे मंत्री एस रघुपती यांनी केला आहे.
मनी लाँड्रींग प्रकरणात ईडी केली अटक :मंत्री सेंथील बालाजी यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ईडी कोठडी ठोठावली, मात्र ईडीच्या कोठडीत असतानाच मंत्री सेंथील बालाजी यांना रडू कोसळले. यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ईडी कोठडीत रडू कोसळल्यानंतर सेंथील बालाजी यांच्यावरुन चांगलेच राजकारण सुरू झाले आहे.
ईडी कोठडीत मंत्री सेंथील बालाजी यांना टॉर्चर :तामीळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री सेंथील बालाजी यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे. मात्र त्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे. ईडी कोठडीत सेंथील बालाजी यांना टॉर्चर करण्यात येत असल्याचा आरोप तामीळनाडूचे कायदा मंत्री एस रघुपती यांनी केला आहे. त्यामुळे मंत्री सेंथील बालाजी यांना ईडीने अटक केल्याच्या प्रकरणात मोठे आरोप करण्यात येत आहेत.
चेन्नईत रॅपीड अॅक्शन फोर्स तैनात :तामीळनाडूचे मंत्री सेंथील बालाजी यांना ईडीने अटक केल्यानंतर तामीळनाडूत चांगलाच गदारोळ झाला. ईडीने अटक केल्यानंतर कोठडीतच सेंथील बालाजी यांना रडू कोसळले. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. सेंथील बालाजी यांना अटक केल्यामुळे चेन्नईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सेंथील बालाजी दाखल असलेल्या ओमानदुरार सरकारी रुग्णालयात रॅपीड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहे. रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी रुग्णालयाला वेढा दिला आहे.
हेही वाचा -
- Jitan Ram Manjhi Son Resigned : बिहारमध्ये राजकीय उलथापालथ; जीतनराम मांझीच्या मुलाचा मंत्रिपदाचा राजीनामा