नवी दिल्ली Money Laundering Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं ईडी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीनं दाखल केलेलं पुरवणी आरोपपत्र आणि ईसीआयआर रद्द करण्यासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कथित 200 कोटी रुपये मनी लाँड्रींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर विविध आरोप करण्यात आले होते.
ईडीनं दाखल केलं पुरवणी आरोपपत्र :ईडीनं 200 कोटी मनी लाँड्रींग प्रकणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळं या पुरवणी आरोपपत्राबाबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पुरवणी आरोपपत्रातून सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिन फर्नांडिसला कसं फसवलं, याचा उलगडा होईल, असा दावाही जॅकलिन फर्नांडिसच्या वतीनं करण्यात आला आहे.
सुकेश चंद्रशेखरबाबत माहिती नव्हती :मनी लाँड्रींग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरोधातही ईडीनं गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा सहभाग नसल्याचा दावा जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांनी केला आहे. जॅकलिनला आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांनी केल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
सुकेश चंद्रशेखरनं दिल्या महागड्या वस्तू भेट :मनी लाँड्रींग घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखर यानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला महागड्या वस्तू भेट दिल्याचा ईडीनं दावा केला आहे. त्यासह जॅकलिनच्या भावाला आणि बहिणीलाही सुकेश चंद्रशेखर यानं महागड्या वस्तू आणि गाड्या भेट दिल्याचा ईडीनं दावा केला आहे. त्यासह ठग सुकेश चंद्रशेखर यानं जॅकलिन फर्नांडिसच्या आई आणि वडिलांनाही महागड्या वस्तू आणि गाड्या भेट दिल्याचा दावा ईडीनं केला आहे.
हेही वाचा :
- Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर
- Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग प्रकरण! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस संबंधित सुनावणी 20 डिसेंबरला
- sukesh write letter to jacqueline fernandez : सुकेशने इस्टरच्या दिवशी लिहिले जॅकलीन फर्नांडिससाठी रोमँटिक पत्र...