महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही'ची तब्बल पाच तास चौकशी; वाचा काय आहे प्रकरण - आर्थिक गुन्हे शाखा नोरा चौकशी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात नोराची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. (Actress Nora Fatehi) त्यानंतर ती EOW कार्यालयातून बाहेर पडली.

Nora Fatehi
Nora Fatehi

By

Published : Sep 15, 2022, 6:56 PM IST

Updated : Sep 15, 2022, 9:28 PM IST

नवी दिल्ली -अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बुधवारी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरूवारी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी बोलावले होते.याच प्रकरणात नोराची तब्बल (Actress Nora Fatehi five Hours Interrogated) पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ती EOW कार्यालयातून बाहेर पडली.

ईडी चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोराला एका खास इव्हेंटबद्दल प्रश्न विचारले आहेत. 2020मध्ये चेन्नई येथे झालेल्या या इव्हेंटमध्ये नोरा सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे सुकेश बरोबरच्या पर्सनल चॅट्स देखील नोराला यावेळी दाखवाव्या लागल्या आहेत.

या चौकशीवेळी नोरा बरोबर सुकेशची पत्नी लीना मारिया पॉसही होती. तिला देखील त्या इव्हेंटबाबत प्रश्न विचारले गेले. नोरा या प्रश्नावर उत्तर देत म्हणाली, चेन्नईमध्ये एक इव्हेंट झाला होता. एक्सीड एंटरटेनमेंट प्राइव्हेट लिमिटेड एजंसीकडून हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. लीनाने या इव्हेंटमध्ये मला गूची ब्रँडची बॅग आणि आयफोन दिला होता.

माझा नवरा तुमचा मोठा फॅन आहे. त्यांना तुला भेटायचे आहे. पण आता तू त्याच्याशी फोनवर बोल असे म्हणून तिने फोन लावला आणि स्पीकरवर ठेवला. तेव्हा फोनवर सुकेशने मला थँक्यू म्हटले होते. तसेच, त्यावेळी लीनाने मला BMW कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली होती अशीही माहिती समोर आली आहे.

नोरा पुढे म्हणाली, सुकेशने एका अनोळखी माणसाच्या फोनवर मला फोन केला. माझे पुढचे डिटेल्स देण्यासाठी मी त्याला माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा बॉबचा नंबर दिला. त्यानंतर मी बॉबला सांगितलं होत की सुकेशला सांगा मला BMWची गरज नाही. माझ्याकडे एक BMW आहे. बॉबने सुकेशला ही गोष्ट सांगितल्यानंतरही त्याने बॉबला BMW ऑफर केली. त्याला डिलचे टोकन दिले होते. बॉबच्या नावावर BMW कार बुक केली असही ती म्हणाली आहे.

Last Updated : Sep 15, 2022, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details