नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळली जात आहे. या मालिकेला सुरुवात होताच, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ( Jasprit Bumrah injured ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी या उर्वरित सामन्यांसाठी मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj replaces injured Jasprit Bumrah ) संधी देण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती दिली.
युवा गोलंदाज सिराजने अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठीही त्याला संधी मिळू शकते. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी-20 मालिकेसाठी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश केला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी सांगितले. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले, बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
28 वर्षीय उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ( Fast bowler Mohammad Siraj ) आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये झालेला पहिला सामना त्यांनी आठ विकेट्सने जिंकला. दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल.
मोहम्मद सिराजने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून तो चमकला. यानंतर, 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळून त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ( Mohammad Siraj T20I debut ) केले. सिराजने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.