नवी दिल्ली - सीतापूर प्रकरणातील मोहम्मद जुबेरच्या अंतरिम जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी (७ सप्टेंबर)रोजी होणार आहे. ( Mohammad Zubair ) या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
सत्र न्यायालयात सुनावणी - त्याचवेळी, फॅक्ट चेक वेबसाइट ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी सोमवारी दिल्लीत दाखल एफआयआर संदर्भात पटियाला हाऊस कोर्टाच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ( Alt News co founder Mohammad Zubair ) त्यावर आज सत्र न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी केली.
जुबेरला २७ जून रोजी अटक करण्यात आली - दिल्लीत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पटियाला हाऊस कोर्टाच्या मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट स्निग्धा सरवरिया यांनी जुबेरचा जामीन अर्ज फेटाळला होता. ( Mohammed Zubair interim bail extended ) जुबेरला २७ जून रोजी अटक करण्यात आली होती. जुबेरवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. धार्मिक भावना भडकावण्यासोबतच, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झुबेरविरुद्ध भारतीय दंड संहितेची कलम १२०बी, २०१ आणि एफसीआरएची कलम ३५ जोडली आहे.
८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने झुबेरला पाच दिवसांसाठी जामीन - उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्येही झुबेरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तीन संतांना हेटमॉंगर म्हणून ट्विट केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीतापूरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने झुबेरला पाच दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. सीतापूरशिवाय युपीमध्ये झुबेरविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात