रायबरेली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या (75 years of Indian Independence) निमित्ताने, उत्तर प्रदेश सरकारने देशातील जनतेला प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. प्रयागराजचे रहिवासी असलेले मोहम्मद कासिम, यांनी सरकारच्या या सूचनेचे पालन केले. 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान अंतर्गत, त्यांनी लोकांना जागरुक करण्यासाठी, हातात तिरंगा घेऊन प्रयागराज ते लखनौ अशी पदयात्रा (mohammad qasim foot march) सुरू केली. मंगळवारी मोहम्मद कासिम रायबरेली येथे (mohammad qasim in raebareli) पोहोचले. आपल्या देशाबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण करणे व त्यांना जागरुक करणे; हा या पदयात्रेचा उद्देश आहे, असे कासिम यांनी सांगितले.
पदयात्रेच्या मार्गावर गावे, शहरे इत्यादी ठिकाणी जे लोक भेटतात, त्यांना मोहम्मद कासिम तिरंगा लावण्यासाठी जागरुक करतात. त्याचबरोबर त्यांनी सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. प्रयागराजचे मोहम्मद कासिम अहमद हे तिरंग्याचा कार्यक्रम घरोघरी, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा करत आहेत. प्रयागराज ते लखनौ पदयात्रेला निघालेले मोहम्मद कासिम, मंगळवारी पाचव्या दिवशी रायबरेलीला पोहोचले आहे. तेथील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.