महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mohammad Azharuddin: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीन यांच्या वडिलांचे निधन

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (Hyderabad cricket association) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांचे वडील मोहम्मद युसूफ यांचे आजारपणामुळे निधन झाले. (Azharuddins father passed away) त्यांना काही दिवसांपासून फुफ्फुसाचा त्रास होता.

मोहम्मद अझरुद्दीन आणि मोहम्मद युसूफ
मोहम्मद अझरुद्दीन आणि मोहम्मद युसूफ

By

Published : Oct 19, 2022, 9:48 AM IST

हैदराबाद: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (Hyderabad cricket association) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) याचे वडील मोहम्मद युसूफ यांचे आजारपणामुळे निधन झाले. (Azharuddins father passed away) त्यांना काही दिवसांपासून फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बंजारा हिल्समध्ये नमाज पढल्यानंतर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

अझरुद्दीन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात: मोहम्मद अझरुद्दीन हा भारताचा एक यशस्वी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख खेळाडू होता. त्याने कसोटी सामन्यात 22 आणि एकदिवसीय सामन्यात 7 शतके झळकावली आहेत. तो त्याच्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जात असे. त्यानंतर त्यांनी राजकारणातही हात आजमावला. 2009 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर मुरादाबादमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मोहम्मद अझरुद्दीनवर 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप लावल्या गेला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदीही घालण्यात आली होती, पण 12 वर्षे कोर्टात लढल्यानंतर अखेर तो विजयी झाला. न्यायालयाने 2012 मध्ये त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली होती. सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या अझरुद्दीनचे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशीही वाद सुरू आहेत. उप्पल स्टेडियमवर नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये तिकिटांच्या विक्रीवरून बराच गदारोळ झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details