महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Muslim Statement : मोदींच्या मुस्लिमांवरील वक्तव्याचे संतांकडून स्वागत, दोन समाजातील वादासाठी पीएफआयला ठरवले दोषी - काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाबाबत बयानबाजी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला दिला होता. पंतप्रधान म्हणाले होते की, मुस्लिम समाजाबद्दल चुकीची विधाने करू नका. हरिद्वारच्या संतांनी हा सल्ला योग्य असल्याचे म्हटले आहे.

Modis statement on Muslims welcomed by Hindu saints
मोदींच्या वक्तव्याचे संतांकडून स्वागत

By

Published : Jan 20, 2023, 10:25 AM IST

मोदींच्या वक्तव्याचे संतांकडून स्वागत

हरिद्वार : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याला विश्व हिंदू परिषदेच्या फायरब्रँड नेत्या साध्वी प्राची आणि काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप यांनीही पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला :राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाबाबत बयानबाजी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला दिला होता. पंतप्रधान म्हणाले होते की, मुस्लिम समाजाबद्दल चुकीची विधाने करू नका. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशातील अल्पसंख्यांक समाजाशी मतांची अपेक्षा न ठेवता भेटले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेल्या या सल्ल्यावरून काही ठिकाणी वाद निर्माण होताना दिसत आहे. मात्र संतांनी हा सल्ला योग्य असल्याचे म्हटले आहे.

मोदींच्या वक्तव्यावर साध्वी प्राची काय म्हणाल्या? :आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या फायर ब्रँड नेत्या साध्वी प्राची यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सल्ल्याचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही सुरुवातीपासून म्हणतो आहे की हा देश आपल्या सर्वांचा आहे. प्रत्येकाला या देशात राहण्याचा अधिकार आहे. मात्र सुरवात नेहमी दुसरा पक्ष करतो, हिंदू नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षात ठेवावे. पीएफआयवर बंदी घालावी, अशी मागणी आम्ही 10 वर्षांपूर्वी केली होती. पण थोडा वेळ गेला. पीएफआयवर बंदी घातल्याने घटना थांबल्या, त्यामुळे आता कोण पुढाकार घेत होते हे समजू शकेल.

काली सेनेनेही केले स्वागत : काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत की हे सर्व हिंदूंचेच डीएनए आहेत. कोणत्याही मुस्लिमाला आम्ही आमचा भाऊ मानतो. आम्ही त्यांना आमचे भाऊ म्हणूनच भेटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुस्लिमांना आपले बांधव मानूनच हा सल्ला दिला आहे.

चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सुचना :नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये करणे टाळावे अशा सूचना दिल्या होत्या. बैठकीत पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता हा सल्ला दिला होता. दिवसभर काही नेते चित्रपटांवर विनाकारण वक्तव्य करतात. मग दिवसभर वृत्तवाहिन्यांवर तीच चर्चा सुरू असते, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. सध्या नागरिकांमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :PM Modi Message to BJP Cadre : पठाण चित्रपटाचा वाद; अनावश्यक चर्चा टाळण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details