नवी दिल्ली - शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) 21 वी परिषद ही 17 सप्टेंबरला दुशान्बेमध्ये होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित होणार आहेत. तर परराष्ट्रमंत्री हे प्रत्यक्ष बुधवारी उपस्थित राहणार आहेत.
शांघाय परिषदेची बैठक ही ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रहमान यांच्या अध्यक्षेताखील होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व करणार आहेत. दुशान्बेमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या समितीची बैठक ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपस्थितीत अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. परिषदेचा 20 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे यंदा परिषदेची बैठक विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे.
हेही वाचा-जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश
गेल्या 20 वर्षातील कामाचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच संघटनेकडून भविष्यातील असलेल्या विविध संधीबाबत चर्चा केली जाणार आहे. महत्त्वाच्या प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.