नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरुन गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगित दिली आहे.
शिक्षेला स्थगिती देण्यास नकार :राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मोदी आडनावावरुन केलेल्या टीकेमुळे गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली आहे. गुजरात उच्च न्यायालयानेही मोदी आडनावाच्या शेरेबाजीवरुन राहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती बी आर गवई, पी एस नरसिंह आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे.
अंतरिम दिलासा देण्यास दिला होता नकार :राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलैला सहमती दर्शवली होती. खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय राहुल गांधी यांच्या याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. भाजप नेते पूर्णेश मोदींना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट निश्चित केली होती.
वैयक्तिक वैरामुळे मोदी आडनावावर टीका : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदी आडनावावर सरसकट टीका केल्याचा आरोप होता. याविरोधात गुजरात भाजपचे नेते पूर्णेश मोदी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक वैरामुळे संपूर्ण मोदी आडनाव असलेल्या नागरिकांचा अपमान केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता. मोदी आडनावावरुन बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावावी अशी मागणीही पूर्णेश मोदी यांनी केली होती.
राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा :राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या टीकेमुळे त्यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांच्या खंडपीठाने त्यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या बाजुने खटला लढवणाऱ्या ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या खटल्यात तातडीने सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. राहुल गांधी यांनी एप्रिल 2019 मध्ये मोदी आडनावावरुन केलेल्या टीकेमुळे गुजरात न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठवली होती. आता सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा रद्द केली आहे.
हेही वाचा -
- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..
- Rahul Gandhi Marriage : राहुल गांधींचे लग्न कधी होणार? सोनिया गांधी म्हणाल्या...
- RELIF TO RAHUL GANDHI : 'चौकीदार चोर' प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना मोठा दिलासा