नवी दिल्ली - इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. प्रभूपाद स्वामी एक अलौकिक कृष्णभक्त तर होतेच, त्याशिवाय, ते भारत देशाचेही निस्सीम भक्त होते, असे मोदी यावेळी म्हणाले. तसेच महामारीच्या काळात इस्कॉनने घेतलेल्या प्रयत्नांचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले.
स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष नाण्याचे अनावरण
स्वामी प्रभुपाद हे श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म 1896 साली कोलकाता येथे झाला होता. त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले.
शेकडो इस्कॉन मंदिरे आणि अनेक गुरुकुल जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय संस्कृती जिवंत ठेवीत आहेत. भारतासाठी विश्वास म्हणजे आस्था, उत्साह, चैतन्य, आनंद आणि मानवतेवरील विश्वास असल्याचे इस्कॉनने जगात पोहचवले. तसेच कच्छमध्ये भूकंपात, उत्तराखंडमध्ये महापूरात आणि बंगालमधील चक्रीवादळे या दरम्यान इस्कॉनकडून मोठे सेवा कार्य झाल्याचे मोदींनी सांगितले.
स्वामी प्रभुपाद हे श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म 1896 साली कोलकाता येथे झाला होता. 1933 साली श्रील प्रभुपाद यांनी त्यांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली होती. पाश्चिमात्य देशांत श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 1944 साली 'बॅक टू गॉड हेड' नावाने एक इंग्रजी पत्रिका सुरु केली होती. तर 1966 साली International Society For Krishna Consciousness (ISKCON) ची स्थापना केली होती. इस्कॉन ही एक मोठी भक्ती चळवळ असून 'हरे कृष्णा चळवळ' या नावाने ती ओळखली जाते. या माध्यमातून जगभरात वेदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो.