महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Modi On Opposition : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करण्याचे मोदींचे आश्वासन - विरोधी पक्षांच्या एकजुटीवर निशाणा

देशभरातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. हे पक्ष भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची हमी देत ​​आहेत. पण आता मोदींचीही हमी आहे. मी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी देतो असे मोदींनी म्हटले आहे. ते आज भोपाळमध्ये देशभरातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.

Modi On Opposition
Modi On Opposition

By

Published : Jun 27, 2023, 5:46 PM IST

मोदींची विरोधकांवर टीका

भोपाळ : परदेश दौऱ्यावरून परतल्या नंतर मोदींनी पाटण्यातील विरोधी पक्षांच्या सर्वसाधारण सभेवर टीका केली आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीबाबत काँग्रेसच्या हमी धोरणावर पंतप्रधान मोदींनीही प्रत्युत्तर दिले आहे. देशभरातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. हे पक्ष भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची हमी देत ​​आहेत. पण आता मोदींचीही हमी आहे. मी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी देतो. प्रत्येक चोर, दरोडेखोरांवर कारवाईची हमी देतो. ज्याने गरिबांना लुटले, देशाला लुटले असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विरोधी पक्षांच्या एकजुटीवर निशाणा साधत ते म्हणाले की, आज कायद्याची ताकद दिसत आहे.

विरोधकांची भष्ट्रचाराची हमी : जर घोटाळ्याची हमी असेल तर, मोदींचीही हमी आहे. प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी माझी हमी आहे. प्रत्येक चोर, दरोडेखोरांवर कारवाईची हमी. ज्याने गरीबांना लुटले, ज्याने देश लुटला त्याचा हिशोब घेतला जाईल. आज कायद्याचे राज्य सुरू आहे. भ्रष्टाचाराची कारवाई टाळणे हा विरोधकांचा समान कार्यक्रम आहे. जो गुन्हेगार शिक्षा भोगून तुरुंगातून येतो, अनेकदा तेच लोक त्याला भेटायला जातात, ज्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटते, ते तुरुंगातील अनुभव ऐकतात. हे जाणून घेण्यासाठी पाटण्यापेक्षा चांगली जागा कोणती असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. आज आपण पाहत आहोत की जे जामिनावर आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, काही शिक्षा भोगत आहेत किंवा तुरुंगातून अनुभव घेऊन आले आहेत अशांना विरोधक भेटत आहेत.

20 लाख कोटींहून अधिकचे घोटाळे : विरोधक एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांनी 20 लाख कोटींहून अधिकचे घोटाळे केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल एक नवीन शब्द खूप लोकप्रिय होत आहे, हा शब्द म्हणजे हमी. विरोधी पक्ष नेमका काय हमी देत आहे? हे जनतेला सांगण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की विरोधी पक्ष लाखो कोटींच्या घोटाळ्यांची हमी देत ​​आहेत. विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिल्यानंतर असे लक्षात आले की, या सर्वांनी मिळून घोटाळ्याची हमी दिली आहे, असा हल्लाबोल मोदींनी केला.

विरोधकांनी केलेले घेटाळे : विरोधकांनी किमान 20 लाख कोटींचा घोटाळा केला आहे. त्यापैकी एकट्या काँग्रेसचा घोटाळा लाखो कोटींचा आहे. एक लाख 86 कोटींचा कोळसा घोटाळा, एक लाख 76 हजार कोटींचा 2जी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, यात 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा यात समाविष्ट आहे. हेलिकॉप्टरपासून ते मरीनपर्यंत अशा सर्वच क्षेत्रात काँग्रेसने घोटाळे केले आहेत. राजदचे हजारो कोटींचे घोटाळे आहेत. चारा घोटाळा, पशुसंवर्धन शेड घोटाळा, राजदच्या घोटाळ्यांची एवढी लांबलचक यादी पहाता शिक्षा सुनावताना न्यायालयांचीही दमछाक झाली होती. डीएमकेवर बेकायदेशीरपणे १.२५ लाख कोटींचा घेटाळ्यांचा आरोप, टीएमसीचा २३ लाख कोटींचा घोटाळा, रोझ व्हॅली शिक्षक भरती घोटाळा, गाय तस्करी घोटाळा, शारदा घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसवरही सुमारे ७० हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप आहे, असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

2024 मध्ये भाजप प्रचंड मतांनी विजयी होणार :भोपाळमध्ये झालेल्या बूथ वर्कर परिषदेत गुजरातमधून आलेल्या बूथ वर्कर हेतल बेन जानी यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्य की, दिखावा असा प्रश्न उपस्थित केला. ज्याला पंतप्रधान मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात सर्वात लांब उत्तर दिले. ते म्हणाले की, तुम्ही 2014 ची निवडणूक तसेच 2019 ची निवडणूक पाहिली आहे. पण दोन्ही निवडणुकांमध्ये एवढा गदारोळ दिसला नाही. विरोधी पक्षांच्या कृतीवरून हे स्पष्ट होते की देशातील जनतेने 2024 च्या निवडणुकीत भाजपला परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपचा मोठा विजय निश्चित आहे. त्यामुळेच या सर्व विरोधकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच खोटे आरोप करून काही लोकांना फसवून कोणत्याही प्रकारे जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचा निर्धार विरोधक करीत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details